Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गावातील भांडणं संपवण्यासाठी सरपंच परिषदेनं सुचवला फडणवीसांचा मार्ग! ठाकरे ऐकणार?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
CM Uddhav Thackeray And Devendra fadnavis

मुक्तपीठ टीम

ग्रामपंचायत निवडणुकांमधून गावा-गावात होणारी भांडणं संपवण्यासाठी महाराष्ट्रातीस सरपंच परिषदेनं सरकारला एक उपाय सुचवला आहे. राज्यस्तरीय सरपंच परिषदचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे व प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. विकास जाधव यांनी गावातील भांडणांकडे लक्ष वेधलं. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सत्ताकाळात महाराष्ट्रात थेट जनतेतून सरपंचाची निवड सुरु करण्यात आली होती तीच पद्धत ठाकरे सरकारनं पुन्हा अंमलात आणावी, अशी त्यांची मागणी आहे. तसेच सरपंचांना ग्रामसेवकाएवढं मानधन, विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सरपंच, ग्राम पंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य या लोकप्रतिनिधींनाही मतदानाच्या अधिकाराची मागणी केली आहे.

 

ग्रामपंचायतीतील पॅनल्सची नोंदणी करा!

  • ‘गावपातळीवर पक्षांतरबंदी शक्य नसेल तर किमान पॅनेल बंदी कायदा करण्यात यावा.
  • ग्रामपंचायत निवडणुकीत उभ्या राहणार्‍या सर्व पॅनेल्सची नोंदणी केली जावी.
  • त्यामुळे निवडणुकीनंतर निवडून आलेल्या सदस्यांचे इकडून तिकडे जाण्याचे प्रकार बंद होऊ शकतील.
  • यासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली आहे व त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देऊन अशा नियमासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली आहे.

 

सरपंचांना ग्रामसेवकाएवढे मानधन द्या!

  • गावचे सरपंचही २४ तास कामात असतो, त्यामुळे त्यांनाही ग्रामसेवकाच्या पगाराएवढे मानधन मिळाले पाहिजे.
  • मुख्य सचिवाच्या पगाराएवढे मानधन मुख्यमंत्र्यांना असते तर कॅबिनेट मंत्र्यांना अप्पर सचिवांच्या पगाराएवढे तसेच राज्यमंत्र्यांना प्रधान सचिवांच्या व आमदारांना सचिवांच्या पगाराएवढे मानधन असते.
  • त्यामुळे सरपंचांना ग्रामसेवकाच्या पगाराएवढे मानधन देता येत नसेल तर मुख्यमंत्री-मंत्री व अन्य सगळ्यांचे मानधन बंद करा.

 

सरपंचांसाठी स्वतंत्र विधान परिषद मतदारसंघाची मागणी!

  • सरपंचांसाठी स्वतंत्र विधान परिषद आमदारकीचे मतदारसंघ गरजेचे आहे.
  • तसे होणार नसेल तर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या मतदारांमध्ये सरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच पंचायत समिती सदस्यांचा समावेश केला जावा.

 

मतदानाचा हक्क सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनाही मिळावा!

  • विधान परिषदेच्या नगर व सोलापूर या दोन जागांच्या होणाऱ्या निवडणुकीतील मतदारांमध्ये सरपंच व ग्रामपंचायत सदस्य तसेच परिसरातील पंचायत समिती सदस्यांचा मतदार म्हणून समावेश केला जावा.
  • अन्यथा न्यायालयात दाद मागणार आहोत.
  • या निवडणुकांतील मतदानापासून आम्हाला वंचित ठेवून आतापर्यंत कायद्याचे उल्लंघन झाले आहे.
  • स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत मतदानाचा हक्क सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना मिळवून देण्यासाठी न्यायालयीन लढाईचीही तयारी परिषदेने ठेवली आहे.

Tags: cm uddhav thackeraySarpanch Parishadग्रामपंचायत निवडणुकदेवेंद्र फडणवीससरपंच परिषद
Previous Post

किरीट सोमय्यांचे पुन्हा ठाकरेंकडे बोट! मनी लाँड्रिंगचे आरोप!! हवाला किंगला लपवल्याचा आरोप!!!

Next Post

राज्यात ६९ नवे रुग्ण, १३२ रुग्ण बरे! सक्रिय रुग्णांची संख्या हजाराखाली!!

Next Post
maharashtra corona report

राज्यात ६९ नवे रुग्ण, १३२ रुग्ण बरे! सक्रिय रुग्णांची संख्या हजाराखाली!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!