Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

किरीट सोमय्यांचे पुन्हा ठाकरेंकडे बोट! मनी लाँड्रिंगचे आरोप!! हवाला किंगला लपवल्याचा आरोप!!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Kirit Somaiya And Uddhav thackeray

मुक्तपीठ टीम

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आपण ठाकरे सरकारचा आणखी एक घोटाळा बाहेर काढणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार सोमय्या यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबियांशीसंबंधित एका कंपनीत मनी लाँड्रिंग झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, श्रीधर पाटणकर यांच्याशी चतुर्वेदीचे व्यवहार समोर आले आहेत. हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदीला कुठं लपवलं आहे हे मुख्यमंत्र्यांनी सांगावे, तसेच ठाकरे परिवाराशी संबंध असलेल्या चतुर्वेदीला फरार घोषित करा, असे किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

 

उद्धव ठाकरेंचा या कंपनीशी काय संबंध? हे जाहीर करावे…

  • श्रीधर पाटणकर हे श्री जी होम्स या कंपनीत भागीदार आहेत.
  • या कंपनीकडून मुंबईतील शिवाजी पार्क येथे एक इमारत उभारण्यात आली आहे.
  • कोट्यवधींची मालमत्ता असलेल्या या इमारतीच्या बांधकाम प्रकल्पासाठी श्रीधर पाटणकर यांचा काळा पैसा वापरण्यात आला.
  • या प्रकल्पातील २९ कोटी ६२ लाख २९ हजार ३२० रुपये हे आर्थिक गैरव्यवहाराच्या माध्यमातून कंपनीत आले आहेत.
  • त्यासाठी श्रीधर पाटणकर यांनी हवाला ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदी याची मदत घेतली होती.
  • त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्री जी होम्स या कंपनीशी आपला काय संबंध आहे, हे जाहीर करावे, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली.

 

नंदकिशोर चतुर्वेदी याला फरार म्हणून घोषित करावे!

  • केंद्रीय तपास यंत्रणा अनेक दिवसांपासून नंदकिशोर चतुर्वेदीला शोधत आहेत.
  • मात्र, तो सापडत नाही.
  • त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी नंदकिशोर चतुर्वेदीचा पत्ता सांगावा.
  • अन्यथा ईडी आणि कंपनी मंत्रालयाने नंदकिशोर चतुर्वेदी याला फरार म्हणून घोषित करावे.
  • या नंदकिशोर चतुर्वेदी याने आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आणि श्रीधर पाटणकर यांना आपल्या १२ बनावट कंपन्यांचा आर्थिक गैरव्यवहारासाठी वापर करून दिला.
  • मी काही दिवसांपूर्वीच नंदकिशोर चतुर्वेदी आणि आदित्य ठाकरे यांच्यात तीन कंपन्यांच्या माध्यमातून झालेल्या आर्थिक व्यवहाराचे पुरावे सादर केले होते.
  • मात्र, त्यानंतरही उद्धव ठाकरे यांनी या सगळ्याविषयी अद्यापपर्यंत एकही शब्द उच्चारलेला नाही

 

ते प्रवीण कलमे कुठे आहेत?

  • जितेंद्र आव्हाड यांचे वाझे असलेल्या प्रवीण कलमे यांनी माझ्या विरोधात आरोप केले.
  • ते प्रवीण कलमे कुठे आहेत, याची माहिती जितेंद्र आव्हाड देणार का?
  • कलमे भारतात आहेत की विदेशात.
  • त्यांनी म्हटलं की, कलमे यांनी सरकारी फाईलमधून कागद चोरले आहेत.
  • सरकार कारवाई का कारवाई करत नाही.
  • कलमे यांना जितेंद्र आव्हाड यांनी मदत केली?
  • अनिल परब यांनी मदत केली की उद्धव ठाकरे यांनी मदत केली?
  • प्रवीण कलमे यांना फरार घोषित केलं जावं.

 

#मुक्तपीठ #Live

किरीट सोमय्यांचे पुन्हा ठाकरेंकडे बोट! मनी लाँड्रिंगचे आरोप!!

 


Tags: cm uddhav thackerayHawala KinKirit SomaiyaMoney Laundringकिरीट सोमय्यामनी लाँड्रिंगहवाला किंग
Previous Post

सुशांत सिंह राजपूत मृत्यू: सीबीआय काय करतेय? आता काशीत महाअभियान!

Next Post

गावातील भांडणं संपवण्यासाठी सरपंच परिषदेनं सुचवला फडणवीसांचा मार्ग! ठाकरे ऐकणार?

Next Post
CM Uddhav Thackeray And Devendra fadnavis

गावातील भांडणं संपवण्यासाठी सरपंच परिषदेनं सुचवला फडणवीसांचा मार्ग! ठाकरे ऐकणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!