Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

तृणमूल काँग्रेसचे शांतनू सेन राज्यसभेतून निलंबित

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
santanu sen

मुक्तपीठ टीम

‘पेगॅसस’ स्पायवेअरच्या मुद्द्यावरून राज्यसभेत गुरुवारी विरोधकांनी प्रचंड गदारोळ घातला. गुरुवारी, तृणमूल काँग्रेसचे खासदार शांतनू सेन यांनी माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हातातील कागद हिसकावून घेत ते फाडून हवेत भिरकावले. यासंदर्भात त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. शांतनू सेन यांच्या अशोभनीय वर्तनासाठी त्यांना राज्यसभेच्या उर्वरीत सत्रासाठी निलंबित करण्यात आलं आहे.

 

नेमकं काय घडलं राज्यसभेत?

  • गुरुवारी, माहिती व तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव मोबाईलमध्ये हेरगिरी करणाऱ्या पेगॅसस स्पायवेअरवर मोदी सरकारची भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न करत होते.
  • यावेळी त्यांच्या हातातील निवेदन तृणमूल काँग्रेसचे खासदार शांतनू सेन यांनी हिसकावले आणि ते फाडून उपसभापती हरिवंश यांच्या दिशेने भिरकावले.
  • गोंधळामुळे वैष्णव यांनी आपले निवेदन सभागृहाच्या पटलावर मांडले.
  • या प्रकारामुळे भाजपाचे सदस्यही आक्रमक झाले.
  • तृणमूलचे सदस्य आणि केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांच्यामध्ये बाचाबाची सुरू झाली.
  • अखेर त्यांची भांडणे सोडवण्यासाठी सभागृहातील मार्शलना मध्यस्थी करावी लागली.
  • पुरी आणि तृणमूलच्या नेत्यांमध्ये मारहाण झाली.
  • यावेळी एका केंद्रीय मंत्र्याने अतिशय अश्लिल भाषेचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
  • गदारोळ सुरू राहिल्याने सभागृह दिवसभरासाठी तहकूब केले गेले.
  • तृणमूल काँग्रेसचे खासदार शांतनू सेन यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
    राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी शांतनू सेन यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.
  • यावर, पश्चिम बंगालमधील हिंसेची संस्कृती संसदेत आणण्याचा प्रयत्न तृणमूल काँग्रेसकडून केला जात असल्याचा आरोप अश्विनी वैष्णव यांनी केला.

 

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी लोकसभेतही विरोधकांनी कामकाज होऊ दिले नाही. सभागृहाचे कामकाज सुरू होताच काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, अकाली दल या पक्षांच्या सदस्यांनी घोषणाबाजी केली. विरोधकांच्या गोंधळामुळे लोकसभेचे कामकाज दुपारी ४.०० वाजेपर्यंत तीन वेळा स्थगित होऊन दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. तर, राज्यसभेच्या कामकाजात दोन वेळा व्यत्यय निर्माण होऊन दुपारी ३.०० वाजता दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं.


Tags: hardeep singh puriprime minister narendra modiअश्विनी वैष्णवतृणमूल काँग्रेसपेगॅसस स्पायवेअरव्यंकय्या नायडूशांतनू सेनहरदीप पुरी
Previous Post

अ‍ॅमेझॉन, झोमाटो आणि पेटीएमसह जगभरातील २९ हजार वेबसाईट ठप्प

Next Post

“अभ्यासक्रमात पंचवीस टक्के कपात!”

Next Post
varsha gaikwad

"अभ्यासक्रमात पंचवीस टक्के कपात!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!