Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘संत तुकाराम’ भेटणार फक्त मराठी वाहिनीवर!

May 14, 2021
in प्रेस रिलिज
0
Tukaram Marathi Movie

मुक्तपीठ टीम

 

फक्त मराठी वाहिनीवर येत्या रविवारी बहुचर्चित आणि प्रत्येकाच्या हृदयात वसलेले महाराष्ट्राचे लाडके संत तुकाराम महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘तुकाराम’ या भव्य चित्रपटाचा प्रीमियर शो फक्त मराठी वाहिनीवर होणार आहे. या चित्रपटातून तुकारामांचा ‘माणूस ते संत’ असा प्रवास पहायला मिळणार आहे. तुकारामांच्या जीवनातील अनेक पदर चित्रपटातून उलगडून दाखविण्याचा प्रयत्न केला गेला आहे. रविवारी सकाळी ११:०० वा. आणि संध्याकाळी ६:३० वाजता, फक्त मराठी प्रिमीयर मध्ये या चित्रपटातून संत तुकारामांची भेट घडणार आहे.

 

चंद्रकांत कुलकर्णी यांनी पुन्हा एकदा जगाला संत तुकाराम नव्याने समजावेत या भावनेने ‘तुकाराम’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. आणि हीच भावना फक्त मराठीची असल्याचे आम्ही या चित्रपटाचा प्रीमियर रविवारी करण्याचे ठरविले असे फक्त मराठी वाहिनीचे बिझनेस हेड श्याम मळेकरांनी सांगितले.

 

वी. शांताराम यांनी ८५ वर्षांपूर्वी ‘संत तुकाराम’ हा चित्रपट पडद्यावर आणला होता. १९३६ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानंतर मात्र तुकारामांच्या आयुष्यावर काहीही निर्मिती झाली नाही. मी जेव्हा या माणूसपण जागवणाऱ्या महान संताच्या आयुष्यावर चित्रपट काढायचे ठरवले तेव्हा मनात एक धागा पक्का होता की, केवळ जुना काळ उभा करण्यापेक्षा पिरियड सिनेमा म्हणून तो काळ सजवण्यापेक्षा त्या काळातील कालसापेक्ष असे घटक, चिरंतन राहिलेले संस्कार आणि आधुनिक युगातल्या म्हणवणाऱ्यांनी तुकारामांचा लावलेला अन्वयार्थदेखील चित्रपटात दाखवायचा. आधुनिक पिढीसमोर संत तुकाराम उभे करताना ते केवळ अभंगांपुरते मला नको होते. असे तुकाराम या चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी सांगतात.

Tukaram Marathi Movie

महाराष्ट्रासह जगभरात संत तुकाराम महाराजांच्या विचारांनी प्रभावीत मोठा समुदाय आहे. मराठी समजणाऱ्यांना ‘तुकाराम’ माहित नाही अशी व्यक्ती सापडणं दुर्मिळ आहे. त्यामुळे हा चित्रपट मराठीसह अमराठी प्रेक्षकांनाही समजेल असा, तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचा बनविण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे, असे निर्माते संजय छाब्रिया यांचे म्हणणे आहे.

 

अभिनेते जितेंद्र जोशी यांनी तुकारामांची अप्रतिम भुमिका साकारली आहे. तुकारामांच्या पत्नीची भूमिका राधिका आपटे यांनी केली असून बालकलाकार पद्मनाभ गायकवाड, वीणा जामकर, शरद पोंक्षे, प्रतीक्षा लोणकर, यतीन कार्येकर यांच्याही यात महत्वाच्या भूमिका आहेत. अजित दळवी, प्रशांत दळवी लिखित ‘तुकाराम’ चित्रपटाचे जेष्ठ संगीतकार अशोक पत्की व अवधूत गुप्ते हे चित्रपटाचे संगीतकार असून काही गाणी कवी दासू वैद्य यांनी लिहिली आहेत. कलादिग्दर्शक एकनाथ कदम यांनी या चित्रपटातील १६०९ ते १६५० चा कालावधी उभा केला आहे.

 

‘तुकाराम’ चित्रपटासारख्या दर्जेदार कलाकृती अभावानेच निर्माण होतात, त्यामुळे हा अनुभव आपल्या प्रेक्षकांनी आवर्जून घ्यावा म्हणून रविवारी सकाळी ११:००वा. आणि संध्याकाळी ६:३०वाजता या चित्रपटाचा खास प्रीमियर शो आपल्या आवडत्या फक्त मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे.


Tags: Ashok patkijitendra joshiअभिनेते जितेंद्र जोशीअवधूत गुप्तेचंद्रकांत कुलकर्णीजेष्ठ संगीतकार अशोक पत्कीमहाराष्ट्रवी. शांतारामसंत तुकाराम
Previous Post

कोरोनानंतरच्या म्युकरमायकोसिसपासून कसं सुरक्षित राहायचं?

Next Post

रशियाच्या स्पुतनिक लसीचा एक डोस हजार रुपयांना! हैदराबादमध्ये भारतातील पहिला डोस!!

Next Post
Sputnic vaccine 1k

रशियाच्या स्पुतनिक लसीचा एक डोस हजार रुपयांना! हैदराबादमध्ये भारतातील पहिला डोस!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!