Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आजचा दिवस वेगळा, राऊतांच्या रेंजमध्ये भाजपा कमी, काँग्रेस जास्त!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
raut & patole

मुक्तपीठ टीम

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना युपीए नेतृत्वबदलाच्या विषयावरून चांगलेच सुनावले आहे. त्यामुळेच बहुधा आजचा दिवस वेगळा ठरला. संजय राऊत यांनी आज भाजपाला कमी आणि काँग्रेसलाच जास्त झोडले. युपीएचा विषय केंद्रीय पातळीवर असल्यामुळे राज्य पातळीवरील नेत्यांनी त्यावर बोलू नये, असे त्यांनी पटोलेंना फटकारले. त्यांना विषयाचा अभ्यास नसल्याचा खोचक टोलाही त्यांनी मारला. तसेच या विषयावर सोनिया गांधी, राहुल गांधी बोलणार असतील तर आम्ही त्यांना उत्तर देऊ, असेही राऊतांनी बजावले.

राष्ट्रीय विषयावर राज्य, जिल्हा स्तरावरील नेत्यांनी बोलू नये!

  • महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी अभ्यास करणं गरजेचं आहे.
  • यूपीए नेतृत्वाच्या प्रश्नावर सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी भाष्य केल्यास आपण त्यांना उत्तर देऊ.
  • शरद पवार या देशाचे नेते आहेत. शरद पवार, उद्धव ठाकरे काय आहेत हे सर्वांना माहिती आहे. युपीएसंबंधी बोलण्यासाठी युपीएमध्ये असायला पाहिजे असं काही नाही.
  • युपीए राज्याचा विषय नाही, त्यामुळे राज्यातील, जिल्हा स्तरावरील लोकांनी केंद्रीय विषयावर बोलू नये.
  • हा राष्ट्रीय विषय असून राष्ट्राच्या हितासाठी या देशात एका मजबूत विरोधी पक्षाची आघाडी स्थापन व्हायची असेल तर मी सांगितलेल्या भूमिकांवर चर्चा होणं गरजेचं आहे.
  • हे जर महाराष्ट्रातील नेत्यांना कळत नसेल तर त्यांनी राजकीय अभ्यास करणं गरजेचं आहे.

सोनिया गांधी – राहुल गांधीही बोलत नाहीत, चिंतनच करत आहेत!

  • हा दिल्लीतील चर्चेचा विषय असून महाराष्ट्र किंवा इतर राज्यांमध्ये चर्चा होऊ नये.
  • राष्ट्रीय विषयांवर दिल्लीत चर्चा होते आणि तिथेच त्यावर चर्चा झाली पाहिजे.
  • या विषयावर सोनिया गांधी, राहुल गांधी बोलणार असतील तर आम्ही त्यांना उत्तर देऊ.
  • पण ते सुद्धा या विषयावर काही बोलत नसून चिंतन करत आहेत.
  • माझ्यावर कोणी टीका करत नसून ते आपल्या पक्षावरच टीका करत आहेत.

भाजपाचा पराभव कसा करणार?

  • या देशात जर एक उत्तम विरोधी पक्षांची आघाडी निर्माण झाली नाही, तर तुम्ही भाजपाचा पराभव कसा करणार याचं उत्तर मला प्रश्न विचारणाऱ्यांनी द्यायला हवं.
  • ते दिल्लीत येऊन द्यावं, महाराष्ट्रात देऊ नये. हा विषय राष्ट्रीय आघाडीचा आहे, राष्ट्रीय राजकारणातील आहे. जिल्हा किंवा तालुक्यातील नाही हे समजून घेतलं पाहिजे.
  • युपीए मजबूत होऊ नये असं जर काँग्रेसच्या महाराष्ट्रातील लोकांना वाटत असेल तर त्यांनी स्पष्ट करावं.
  •  युपीए २ ची गरज वाटते का? आतापर्यंत तिसरी, चौथी, पाचवी आघाडी अशा नौटंकी झाल्या आहेत, त्या अपयशी ठरल्या आहेत. त्यामुळे जी आताची आघाडी आहे ती कशी मजबूत होईल हे पाहणं गरजेचं आहे.
  • दिल्लीतील काही लोक युपीए-२ स्थापन करण्याच्या तयारीत आहेत म्हणून त्या चिंतेनं मी हे सांगितलं आहे”.

Tags: BJPCongressnana patolesanjay rautकाँग्रेसकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेभाजपयुपीएराहुल गांधीसंजय राऊतसोनिया गांधी
Previous Post

संजय राऊतांची ठाकरे सरकारवर का नाराजी? वाचा आणि समजून घ्या कारणे…

Next Post

ड्रिम मॉल हा घोटाळ्यांचा मॉल! मृत्यूंसाठी मॉल मालकावर कारवाई करा!

Next Post
dream mall

ड्रिम मॉल हा घोटाळ्यांचा मॉल! मृत्यूंसाठी मॉल मालकावर कारवाई करा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!