मुक्तपीठ टीम
शिवसेना नेते संजय राऊत यांनी आजची सकाळ फेसबुक पोस्टद्वारे डरकाळी फोडून सुरु केली आहे.”माझे शब्द नोंदवून ठेवा. बाप बेटे तुरुंगात जाणार…केंद्रीय यंत्रणांचे अधिकारी, वसुली एजंटी!” आपल्या पोस्टमध्ये संजय राऊत यांनी कोणाचेही नाव घेतलेले नसले तरी त्यांचा इशारा हा भाजपा नेते किरीट सोमय्या, त्यांचे नगरसेवक पुत्र नील सोमय्या,केंद्रीय तपास यंत्रणा आणि त्यांच्यासाठी मुंबईतील धनवंतांकडून वसुली करण्याचा आरोप असलेल्यांकडे असल्याचे स्पष्ट दिसते. राऊतांनी ‘झुकणार नाही’ अशा अर्थाचा रोमन लिपीतील हिंदीत हॅशटॅग वापरत आक्रमक भूमिकाही असल्याचं स्पष्ट केलं आहे.
Mark my words…
I repeat :
“Bap Beta jail jayenge”. Period.And rest assured, apart from Baap & Beta, 3 Central agency officials and their “Vasuli Agents” will also go behind bars.
Maharashtra Jhukega nahi ! pic.twitter.com/4SCyOY4Pna
— Sanjay Raut (@rautsanjay61) March 2, 2022
राऊतांचे सोमय्यांवरील याआधीचे आरोप
- पीएमसी बँक घोटाळ्यातील राकेश वाधवान या प्रमुख आरोपीकडून भाजपाला २० कोटी रुपये गेले आहेत.
- किरीट सोमय्यांचा मुलगा नील सोमय्याचे राकेश वाधनावशी आर्थिक संबंध आहेत.
- सोमय्यांच्या निकॉन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीत वाधवानही भागीदार आहेत.
- वसईत सात कोटी रुपयांना विकत घेतलेल्या एका जमिनीवर एक कंपनी उभी राहिली आणि त्या खरेदीसाठी पर्यावरणीय परवानगी नव्हती.
- केंद्रीय तपास यंत्रणांमधील काही अधिकारी हे भाजपाच्या नेत्यांच्या संगनम
सोमय्यांचे राऊतांवर आरोप
- कोरोना उपचारांसाठीच्या जंबो कोरोना सेंटर्समध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सोमय्यांनी अनेकदा केला आहे.
- ती कंपनी ब्लॅकलिस्टेड असल्याचाही त्यांचा आरोप आहे.
- या कंपनीची मालकी संजय राऊत यांच्या मुलींच्या व्यावसायिक भागीदाराकडे असल्यामुळे ही कंत्राटं दिली गेली, असाही त्यांचा आरोप आहे.
- राज्य सरकारने वाइन ही किराणा मालाच्या मोठ्या दुकानांमध्येही विकण्याची परवानगी दिली, त्यामागे संजय राऊतांच्या मुलीची वाइन कंपनीतील भागिदारी असल्याचाही आरोप सोमय्यांनी केला आहे.