मुक्तपीठ टीम
शिवसेना खासदार संजय राऊत यांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. अलिबागमधील ८ भूखंड आणि दादरमधील फ्लॅट जप्त करण्यात आला आहे. १ हजार ३४ कोटींच्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. या कारवाईनंतर संजय राऊत प्रतिक्रिया देताना “एक रुपयाही अवैध मार्गानं जमा झाला असेल तर संपत्ती भाजपाला दान करणार, असे असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. या कारवाईनंतर संजय राऊतांनी “असत्यमेव जयते” असं सूचक ट्वीट देखील केले आहे.
…तर संपत्ती भाजपाला दान करायला तयार!
- २००९ साली हा व्यवहार झाल्यानंतर त्याविषयी कुणी काही विचारणा केली नाही.
- कुठली मालमत्ता? आम्ही काय मालमत्तावाले लोक आहोत का?
- २००९ साली आमच्या कष्टाच्या पैशातून घेतलेली ही जागा आणि घर.
- त्याची आमच्याकडे साधी चौकशी कुणी केली नाही.
- विचारणा केली नाही.
- आत्ता मी टीव्हीवर पाहिलं की मालमत्ता जप्त केली.
- हे काय आर्थिक गैरव्यवहार वगैरे म्हणतात ना, एक रुपयाही अवैध मार्गानं जमा झाला असेल आणि त्यातून आम्ही मालमत्ता खरेदी केली असेल तर संपत्ती भाजपाला दान करायला तयार आहोत.
ईडीला आता त्याच्यात आर्थिक गैरव्यवहार दिसाला…
- २००९ची मालमत्ता आहे.
- एक एकरही पूर्ण जागा नाही.
- आमच्या पत्नीच्या किंवा आमच्या नात्यातल्या लोकांच्या अधिकृत पैशातून घेतलेल्या त्या जागा आहेत.
- ईडीला आता त्याच्यात आर्थिक गैरव्यवहार दिसायला लागला.
- राजकीय सूड कोणत्या थराला जाऊन पोहोचलाय, ते तुम्ही पाहिलं असेल.
यातून लढण्याची अजून प्रेरणा मिळते…
- अशा कारवायांमधून अजून प्रेरणा मिळते.
- आमचं राहतं घर जप्त केले आहे.
- त्यावर भाजपाचे लोक उड्या मारतायत.
- बघितलं मी.. फटाके वाजवतायत.
- मराठी माणसाचं हक्काचं राहतं घर जप्त केल्याबद्दल. आनंद आहे.
- असंच करत राहिलं पाहिजे.
- यातून लढण्याची अजून प्रेरणा मिळते.
संजय राऊतांनंतर आता किरीट सोमय्यांचा पुढचा अजेंडा: “ठाकरेंचे डर्टी डझन!”