Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शिंदे-फडणवीसांना राऊतांचा प्रश्न: संभाजीनगर नामांतर स्थगित करायला औरंगजेब तुमचा नातेवाईक आहे का?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Aurangabad name

मुक्तपीठ टीम

शिवसेनेचे आमदार फुटल्याने शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आले. शिंदे-फडणवीस सरकारने ठाकरे सरकारने घेतलेले अनेक निर्णय स्थगित करण्याची मालिकाच चालवली आहे. परंतु यावेळी ठाकरे सरकारने शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या औरंगाबादचं संभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशीव आणि नवी मुंबईतील विमानतळाला दि.बा.पाटील यांचं नाव देण्याच्या निर्णायाला शिंदे-फडणवीस सरकारने दिलेली स्थगिती ही वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी औरंगाबादच्या संभाजीनगर नावाला स्थगिती दिल्याने शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. औरंगजेब तुमचा नातेवाईक कसा झाला? असा प्रश्न त्यांनी केला आहे.

औरंगजेब तुमचा नातेवाईक कसा झाला?

  • शिवसेनेचा राज्यसभा खासदार संजय राऊत दोन दिवसांच्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत.
  • नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
  • ठाकरे सरकारनं खास करुन औरंगाबादचं संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशीव केलं.
  • नवी मुंबईतील विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचं नाव देण्याचा निर्णय घेतला होता.
  • हे तिन्ही निर्णय फिरवले असतील आणि खरं असेल तर हे सरकार महाराष्ट्रद्रोही आहे.
  • उद्धव ठाकरेंनी हिंदुत्ववादी भूमिकेतून औरंगाबादचं संभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशीव आणि दि.बा.पाटील यांचं नाव विमानतळाला दिलं होतं.
  • या निर्णयांना स्थगिती का दिली हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारायला हवं कारण एकनाथ शिंदे यांच्या हातात काहीच नाही.
  • राजकीय, आर्थिक , बुलेट ट्रेन, आरेचा विषय हे आम्ही समजू शकतो, आम्ही संघर्ष करु पण औरंगजेब तुमचा नातेवाईक कसा झाला?, निजाम काळातील उस्मान तुमचा कोण लागतो?

हे सरकार गोंधळलेलं!!

  • दि.बा. पाटील याचं नाव देण्याचा निर्णय हा लोकभावनेचा आदर म्हणून निर्णय घेतला होता.
  • हे सरकार गोंधळलेलं आहे.
  • या सरकारच्या डोक्यावर सर्वोच्च न्यायालयाची टांगती तलवार आहे.
  • स्थगिती, स्थगिती, स्थगिती असं शिंदे भाजपा सरकारचं सुरु आहे.
  • शरद पवार आणि मी ठरवून एका हॉटेलमध्ये थांबलो होतो, अशा बातम्या तुम्ही चालवू शकता.
  • शरद पवार यांच्यासोबत बोलणं झालं आहे, मी त्यांची भेट घेईन

Tags: AurangabadCm Eknath Shindedevendra fadanvisMaharashtrasanjay rautShivsenaThackeray GovtUsmanabadउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउस्मानाबादऔरंगाबादठाकरे सरकारमहाराष्ट्रमुख्यमंत्री एकनाथ शिंदेशिवसेनासंजय राऊत
Previous Post

इस्कॉनचे संस्थापक प्रभुपाद यांच्या जीवनकार्यावरील पुस्तकाचे राजभवन येथे प्रकाशन

Next Post

‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती’साठी २५ जुलैपर्यंत अर्जाची मुदत

Next Post
Sahitya Ratna Demokratiar Anna Bhau Sathe Scholarship

'साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती'साठी २५ जुलैपर्यंत अर्जाची मुदत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!