Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

इस्कॉनचे संस्थापक प्रभुपाद यांच्या जीवनकार्यावरील पुस्तकाचे राजभवन येथे प्रकाशन

July 15, 2022
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
Maharashtra Governor releases biography of ISKCON Founder Srila Prabhupada

मुक्तपीठ टीम

अमेरिका आणि युरोपीय देश ऐहिक सुखात गुरफटत असताना इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद यांनी त्यांना नृत्य, गायन व प्रार्थनेच्या माध्यमातून भारतीय अध्यात्माचा संदेश सोप्या भाषेत दिला, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद  यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘सिंग, डान्स अँड प्रे’ या चरित्रात्मक ग्रंथाचे प्रकाशन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते आज राजभवन येथे झाले, त्यावेळी ते बोलत होते.

Maharashtra Governor releases biography of ISKCON Founder Srila Prabhupadaपुस्तक प्रकाशन सोहळ्याला इस्कॉन बंगलोरचे वरिष्ठ उपाध्यक्ष तसेच अक्षयपात्र फाउंडेशनचे उपाध्यक्ष चंचलापती दास, हरेकृष्ण चळवळीचे मुंबई प्रमुख अमितासन दास व पुस्तकाचे लेखक – पत्रकार हिंडोल सेनगुप्ता प्रामुख्याने उपस्थित होते.

राज्यपाल कोश्यारी म्हणाले, भारतीय संस्कृती चिरपुरातन आहे तशीच ती नित्य नूतन देखील आहे. अध्यात्म हे भारताचे वैशिष्ट्य आहे. देशावर अनेक संकटे आली तरी देखील अध्यात्म ज्ञान नेहमी अबाधित राहिले. या देशात भगवान श्रीकृष्णाच्या आश्वासनानुसार वेळोवेळी स्वामी विवेकानंद, श्रील प्रभुपाद यांसारख्या प्रभृतींनी जन्म घेतला आहे व त्यांनी अध्यात्म ज्ञान लोकांना दिले आहे असे राज्यपालांनी सांगितले.  प्रभुपाद यांचे जीवनचरित्र प्रेरणादायी असून ते लहान मुलांपर्यंत देखील सोप्या भाषेत पोहोचवले पाहिजे अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली.

१९७० च्या दशकात पाश्चात्य देश भारताकडे एक गरीब देश म्हणून पाहत असताना श्रील प्रभुपाद यांनी भारताचे विशुद्ध आणि श्रीमंत अध्यात्मिक ज्ञान जगाला दिले असे लेखक हिंडोल सेनगुप्ता यांनी सांगितले.


Tags: Government NewsISKCONISKCON Founder Acharya Srila PrabhupadaJeevankarya BookmuktpeethPublishingraj bhavanइस्कॉनइस्कॉन संस्थापक आचार्य श्रील प्रभुपादघडलं-बिघडलंजीवनकार्य पुस्तकप्रकाशनमुक्तपीठराजभवनसरकारी बातमी
Previous Post

वेस्टर्न ऑस्ट्रेलियन शिष्टमंडळाची उपमुख्यमंत्री फडणवीसांशी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील गुंतवणुकीबाबत चर्चा 

Next Post

शिंदे-फडणवीसांना राऊतांचा प्रश्न: संभाजीनगर नामांतर स्थगित करायला औरंगजेब तुमचा नातेवाईक आहे का?

Next Post
Aurangabad name

शिंदे-फडणवीसांना राऊतांचा प्रश्न: संभाजीनगर नामांतर स्थगित करायला औरंगजेब तुमचा नातेवाईक आहे का?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!