मुक्तपीठ टीम
शिवसेनेचे आमदार फुटल्याने शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आले. शिंदे-फडणवीस सरकारने ठाकरे सरकारने घेतलेले अनेक निर्णय स्थगित करण्याची मालिकाच चालवली आहे. परंतु यावेळी ठाकरे सरकारने शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या औरंगाबादचं संभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशीव आणि नवी मुंबईतील विमानतळाला दि.बा.पाटील यांचं नाव देण्याच्या निर्णायाला शिंदे-फडणवीस सरकारने दिलेली स्थगिती ही वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी औरंगाबादच्या संभाजीनगर नावाला स्थगिती दिल्याने शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. औरंगजेब तुमचा नातेवाईक कसा झाला? असा प्रश्न त्यांनी केला आहे.
औरंगजेब तुमचा नातेवाईक कसा झाला?
- शिवसेनेचा राज्यसभा खासदार संजय राऊत दोन दिवसांच्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत.
- नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
- ठाकरे सरकारनं खास करुन औरंगाबादचं संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशीव केलं.
- नवी मुंबईतील विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचं नाव देण्याचा निर्णय घेतला होता.
- हे तिन्ही निर्णय फिरवले असतील आणि खरं असेल तर हे सरकार महाराष्ट्रद्रोही आहे.
- उद्धव ठाकरेंनी हिंदुत्ववादी भूमिकेतून औरंगाबादचं संभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशीव आणि दि.बा.पाटील यांचं नाव विमानतळाला दिलं होतं.
- या निर्णयांना स्थगिती का दिली हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारायला हवं कारण एकनाथ शिंदे यांच्या हातात काहीच नाही.
- राजकीय, आर्थिक , बुलेट ट्रेन, आरेचा विषय हे आम्ही समजू शकतो, आम्ही संघर्ष करु पण औरंगजेब तुमचा नातेवाईक कसा झाला?, निजाम काळातील उस्मान तुमचा कोण लागतो?
हे सरकार गोंधळलेलं!!
- दि.बा. पाटील याचं नाव देण्याचा निर्णय हा लोकभावनेचा आदर म्हणून निर्णय घेतला होता.
- हे सरकार गोंधळलेलं आहे.
- या सरकारच्या डोक्यावर सर्वोच्च न्यायालयाची टांगती तलवार आहे.
- स्थगिती, स्थगिती, स्थगिती असं शिंदे भाजपा सरकारचं सुरु आहे.
- शरद पवार आणि मी ठरवून एका हॉटेलमध्ये थांबलो होतो, अशा बातम्या तुम्ही चालवू शकता.
- शरद पवार यांच्यासोबत बोलणं झालं आहे, मी त्यांची भेट घेईन