मुक्तपीठ टीम
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची पहाटे साडे चार वाजल्यापासून ईडीने चौकशी सुरु आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची संपत्ती खरेदी केल्याप्रकरणात ईडी आणि इतर तपास यंत्रणांकडून कारवाई सुरू आहे. ईडीनं केलेल्या राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. नवाब मलिक यांच्यावर करण्यात आलेली ही कारवाई सूडाचं राजकारण असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील नेते मंडळी करत आहेत. या चौकशीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्राच्या एका कॅबिनेट मंत्र्याला, घरी येऊन घेऊन जातात ही खंत…
- मलिक असतील किंवा आमच्यासारखे खूप लोक आहेत. जे सातत्याने बोलत आहेत.
- असत्याचा पर्दाफाश करत आहेत.
- मुखवटे उखडून काढत आहेत.
- त्यांच्यामागे हे ईडी, सीबीआय वगैरे लावलं जातंय.
- जी काही मलिकांची चौकशी होईल.
- आम्ही वाट पाहतोय.
- नक्कीच ते संध्याकाळी घरी येतील.
- महाराष्ट्राच्या एका कॅबिनेट मंत्र्याला, घरी येऊन घेऊन जातात, याबद्दल खंत आहे.
- चौकशी होऊ शकते एखाद्या गोष्टीची.
- चौकशी पण कशी हे २० वर्षांनी करत आहेत.
- २० वर्षांपूर्वीचं प्रकरण, २५ वर्षांपूर्वीचं प्रकरण.
किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराविरोधात लढणारे महात्मा…
- किरीट सोमय्या यांनी भाजपाच्या नेत्यांचीच काही प्रकरणं ईडीकडे दिली आहेत.
- आज जे भाजपचे मंत्री आहेत, पदावर आहेत.
- त्यांची अनेक प्रकरणं आहेत.
- त्यामुळे किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराविरोधात लढणारे महात्मा ही पदवी चांगली आहे.
- कारण मी काहीही बोललं तरी त्यांना वाटतं मी शिवी दिली.
- हे जे महात्मा आहेत, त्यांनी ईडीकडे अनेक प्रकरणं दिली आहेत.
- त्यांच्याकडे समन्स का गेलं नाही, त्यांच्या घरी ईडी का गेली नाही?
- आता ही सगळी प्रकरणं आम्ही परत एकदा ईडीकडे घेऊन जाणार आहोत.
- तक्रार कशी करायची, हे आम्हाला माहिती आहेत.
- यापूर्वीच्या तक्रारीचं काय झालं हेही विचारणार आहोत?
- समन्स, ईडीची पथकं ही फक्त महाविकास आघाडी, तृणमूल काँग्रेस, अखिलेश यादव यांचा पक्ष, लालू यादव यांच्यापुरतेच मर्यादित आहेत, की त्यांच्यासाठीच या केंद्रीय तपास यंत्रणांची रचना आणि नियुक्ती झालेली आहे, हे पाहू.
२०२४ पर्यंत हे सगळं चालेल…
- २०२४ पर्यंत हे सगळं चालेल.
- त्यानंतर ते आहेत आणि आम्ही आहोत.
- जे भाजपचे विरोधक आहेत किंवा जे सत्य बाहेर आणतायत. त्यांच्याचमागे या तपास यंत्रणा एखाद्या माफिया टोळीप्रमाणे लावल्या जातात.
- पण आम्ही घाबरत नाही.
- ही लढाई सुरुच राहिल, त्यांना येऊ द्या, तपास करु द्या.
- कितीही बनावट करु द्या, शेवटी सत्याचा विजय या देशात होत असतो.
- प्रत्येक गोष्टीवर आमचं लक्ष आहे.
- आताच माझं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी बोलणं झालं.
- अनेक विषयांवर चर्चा झाली. सोपं नाही.
- २०२४ नंतर जे काही घडणार आहे, त्याची तयारी या तपास यंत्रणांनी ठेवावी.
हेही वाचा:
नवाब मलिकांमागे ईडी पिडा: पहाटे साडेचारच्या गुड मॉर्निंगपासून पुढे काय काय घडतंय…
नवाब मलिकांमागे ईडी पिडा: पहाटे साडेचारच्या गुड मॉर्निंगपासून पुढे काय काय घडतंय…
मलिकांमागे ईडी पिडा: शरद पवार म्हणाले, “प्रकरण काढून अडकवलं जाईल याची खात्री होती!”
मलिकांमागे ईडी पिडा: शरद पवार म्हणाले, “प्रकरण काढून अडकवलं जाईल याची खात्री होती!”