मुक्तपीठ टीम
महात्मा गांधीवर गोळ्या झाडल्या गेल्या. मात्र, आजही गांधीजी जिवंत आहेत. कुणी अस्सल मर्द हिंदुत्ववादी असता, तर गांधीजींवर नाही तर पाकिस्तान मागणाऱ्या जिन्नाला गोळी मारली असती, असे मत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मांडले आहे.
शिवसेना नेते संजय राऊत काय म्हणाले?
अस्सल मर्द हिंदुत्ववादी असता तर…
- जर कुणी हिंदुत्ववादी असता, असली असता, तर जिन्नावर गोळी झाडली असती.
- पाकिस्तानची मागणी करणाऱ्या जिन्नावर गोळी झाडली असती.
- पाकिस्तानची मागणी करून हिंसाचार करणाऱ्याला गोळी मारली पाहिजे होती.
- पण जिन्नाला कुणी गोळी मारली नाही.
- गांधीजींसारख्या एका निशस्त्र फकिराला गोळी मारणे, योग्य नव्हते.
गोळी मारूनही गांधीजी आजही आहेत!
- गांधीजींच्या काही भूमिकांवर टीका होवू शकते.
- पण सत्याग्रह करण्याचं, निशस्तर लढा देत ब्रिटिशांना धक्का दिला.
- भगतसिंहसारख्या क्रांतिकारकांचे महत्व आहेच.
- पण त्यांच्यासारख्या निशस्त्र माणसावर गोळी झाडणे योग्य नव्हते.
- गोळी मारूनही गांधीजी संपले नाहीत, ते आजही आहेत.
महात्मा गांधींच्या हुतात्मा दिनी शाळांमधून गांधी विचारांचा जागर
महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त राज्यातील शाळांमधून विविध शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर तसेच गांधी विचार हा भारतीय विचार व्हावा असा संदेश देणारे करिअर कौन्सिलर आशुतोष शिर्के यांचे महात्मा गांधी यांचे जीवन आणि विचार या विषयावर सकाळी ११ वाजता यु ट्युबच्या माध्यमातून व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. https://youtu.be/eKc8s4rZei4 या लिंकवर हे व्याख्यान ऐकता येणार असून विद्यार्थी, शिक्षक, पालक तसेच नागरिकांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले आहे.
शिक्षण ही मानवी जीवनावर दीर्घकाळ परिणाम करणारी प्रभावी प्रणाली आहे. असे म्हणत नयी तालीमच्या रूपाने देशाला शिक्षणाची अनोखी देणगी देणाऱ्या महात्मा गांधींयांचा ३० जानेवारी हा स्मृतिदिन यानिमित्त त्यांनी देशाला दिलेल्या मन, मनगट आणि मस्तक यांचा विचार प्रत्येक शिक्षकापर्यंत पोहोचावा आणि शिक्षकांनी तो विद्यार्थ्यांमध्ये रूजवावा यासाठी ३० जानेवारी २०२२ या हुतात्मादिनी विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली.