मुक्तपीठ टीम
राज्य मंत्रिमंडळाने शिफारस करुन दहा महिने झाले, तरीही विधानपरिषद सदस्यपदी नियुक्ती झालेली नाही. या नियुक्त्या न होणे हा विधिमंडळाचा आणि महाराष्ट्रातील जनतेचा अपमान असल्याचा आरोप शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राज्यपाल घटनात्मक पदावर बसून घटनेच्या मारेकऱ्याचे काम करत आहेत, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली आहे. या नियुक्त्या का नाही केल्या ते राज्यपालांनी स्पष्ट करावं, अशी मागणीही त्यांनी केली.
राज्यपाल घटनात्मक पदावर बसून घटनेच्या मारेकऱ्याचे काम करत आहेत, अशी घणाघाती टीका खासदार संजय राऊत यांनी केली. नाशिकमधील दोन भाजप नेत्यांच्या शिवसेनेत घरवापसीनंतर माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊतांनी विविध मुद्द्यांवर मतप्रदर्शन केले.
नक्की पाहा व्हिडीओ – संजय राऊतांचा अनकट सामना
त्यांनी मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत:
पत्रकार परिषदेत कोणत्या मुद्द्यावर काय म्हणाले संजय राऊत …
राज्यपाल नियुक्त आमदार
– राज्य मंत्रिमंडळाने शिफारस करुनही १२ जणांची विधानपरिषद सदस्य पदी नियुक्ती झालेली नाही. या नियुक्त्या न होण हा विधिमंडळाचा अपमान
– हे घटनेचे मारेकरी
– या नियुक्त्या का नाही केल्या ते राज्यपालांनी स्पष्ट करावं
– घटनात्मक पदावर बसून ते घटनेच्या मारेकऱ्याचे काम करीत आहेत
-त्यांना कोणी काय सूचना देत आहे, ते त्यांनी स्पष्ट करावे
पक्षप्रवेश
-वसंत गीते आणि सुनील बागूल यांचं सेनेत प्रवेश.
-या दोन नेत्यांचा प्रवेशामुळे सेनेला नाशिक मध्ये भक्कम ताकत मिळणार.
-गीते आणि बागुल या दोनही नेत्यांचं सेनेत मनापासून मी स्वागत करतो.
औरंगाबाद विमानतळाचे नामकरण
– औरंगाबाद विमानतळ नाव बदलण्याचा ठराव राज्य कॅबिनेटनं मंजूर करून केंद्राला पाठवला.
– धर्मवीर छत्रपती संभाजीराजे विमानतळ हा प्रस्ताव.
– काँग्रेस मनातून संभाजीनगर नावाला सकारात्मक.
– बिहार मधील औरंगाबाद जिल्ह्याचं नामांतर करावं अशी मागणी.
ईडीची कारवाई
– माझ्यावर कोणताही घाव,वार, हल्ला याचा परिणाम होत नाही
– नोटिसा म्हणजे सरकारी कागद
– आम्ही तलवार उपसली तर अनेकांना पळापळ करावी लागेल
– ed आणी cbi मागे लावणाऱ्यांनी लक्षात ठेवावं
– मी विरोधी पक्षांचा सन्मान राखतो
– प्रताप सरनाईक यांना वेगळा न्याय आणी गिरीश महाजन यांना वेगळा का ?
दिल्ली शेतकरी आंदोलन
– दिल्ली आंदोलनात शेतकऱ्यांचे मृत्यू झाले हे केंद्रानं केलेले खून
– राज्यात या आत्महत्यांवर तोडगा निघेल
किरीट सोमय्या आरोप
– त्यांचा जन्म आरोपातून झालाय
– आरोपच केलाय ना बघू