Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईत पोलिसाला गोळ्या झाडून जिवे मारण्याची धमकी

January 10, 2021
in कायदा-पोलीस
0
police constable

शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस शिपाई बडे यांना गोळ्या झाडून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी वॉण्टेड असलेल्या मुख्य आरोपीसह चार आरोपींना शिवाजीनगर पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. चारही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. यातील बहुतांश गुन्ह्यांत त्यांना पाहिजे आरोपी आहेत.

 

सद्दाम ऊर्फ मच्छी मुस्ताक हाश्मी, फैयाज नूरमोहम्मद सिद्धीकी, राशिद अख्तर सोहेब खान ऊर्फ राशिद कान्या आणि अक्तर कमरुल खान अशी या चौघांची नावे आहेत, अटकेनंतर या चौघांना स्थानिक महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले होते, यावेळी त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या वृत्ताला वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर गायके यांनी दुजोरा दिला आहे. ३ जानेवारी गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात स्थानिक पोलिसांकडून ऑपरेशन क्लीन अप सुरु करण्यात आले होते, त्यात पोलीस ठाण्यातील अभिलेखावरील गुन्हेगारांची तपासणी करणे, अवैध धंद्यावर कारवाई करणे, पाहिजे आरोपींचा शोध घेणे आदी मोहीम सुरु करण्यात आली होती. ही कारवाई सुरु असताना शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील गुंडाविरोधी पथकात कार्यरत असलेले पोलीस शिपाई बडे यांना सद्दाम हाश्मीने फोन केला होता, ही कारवाई तातडीने थांबवा, नाहीतर गोळ्या झाडून जिवे मारण्याची त्याने त्यांना धमकी दिली होती.

 

या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत सद्दामसह त्याच्या सहकार्‍यांचा शोध सुरु केला होता, ही शोधमोहीम सुरु असतानाच वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर गायके यांच्या विशेष पथकाने बुधवारी रात्री उशिरा सद्दामसह त्याचे तीन सहकारी फैयाज, राशिद आणि अक्तर या चौघांना गोवंडी परिसरातून अटक केली. चौकशीत ते चौघेही शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील अभिलेखावरील गुन्हेगार आहे, सद्दामविरुद्ध शिवाजीनगर पोलीस पाच, राशिदविरुद्ध दोन, फैयाजविरुद्ध सहा तर अक्तरविरुद्ध एका गुन्ह्यांची नोंद आहे. या सर्व गुन्ह्यांत त्यांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले होते, त्यामुळे त्यांना या सर्व गुन्ह्यांत अटक केली जाणार आहे. अटकेनंतर या चौघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्या अटकेच्या अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.


Tags: muktpeethPolice threatenपोलिसमुक्तपीठ
Previous Post

तब्बल ११ वर्षांनी रोहित-गिलच्या जोडीने केला हा पराक्रम

Next Post

“घटनात्मक पदावर बसून राज्यपालांचे घटनेच्या मारेकऱ्याचे काम”

Next Post
sanjay raut -1

"घटनात्मक पदावर बसून राज्यपालांचे घटनेच्या मारेकऱ्याचे काम"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!