Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

टाकावू काळे तेल आणि ज्वालाग्राही पदार्थाची अनधिकृतपणे साठा

प्रक्रिया केलेल्या काळ्या तेलाची विक्री करणार्‍या चारजणांना अटक

January 8, 2021
in कायदा-पोलीस
0
furnace oil

टाकावू काळे तेल आणि ज्वालाग्राही पदार्थाची अनधिकृतपणे साठवणूक करुन पर्यावरणाला हानी पोचविणार्‍या तसेच प्रक्रिया केलेल्या काळ्या तेलाची विक्री करणार्‍या एका टोळीचा गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी चारजणांना पोलिसांनी अटक केली असून अटकेनंतर या सर्वांना पुढील कारवाईसाठी मानखुर्द पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. मोहम्मद खलील इद्रीसी, मोहम्मद अफजल मोहम्मद अली खान, इरफान मोहम्मद सईद मंसुरी आणि स्वामीनारायण फुरसत डोसाड अशी या चौघांची नावे आहेत. या कारवाईत पोलिसांन पावणेदहा लाख रुपयांचा काळे तेलाचा साठा आणि १९५ ड्रम जप्त केल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांनी सांगितले.

 

 

मानखुर्द येथील मंडाळा, कुर्ला स्क्रप खाडीलगत एक मोकळी जागा असून या ठिकाणी काही इसम तेल आणि तत्सम ज्वाहाग्राही पदार्थाचा साठा करुन त्यावर प्रक्रिया करुन उर्वरित ज्वालाग्राही पदार्थ खाडीमध्ये सोडून पर्यावरणास नुकसान आणि हानी पोहचवित असल्याची माहिती पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी सहपोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, अतिरिक्त पोलीस आयुक्त विरेश प्रभू, पोलीस उपायुक्त प्रकाश जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त अविनाश शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निनाद सावंत, संजय निकम, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद माळवे, राजेश पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दयानंद कांबळे, कृष्णा नार्वेकर, प्रकाश यदव, पोलीस हवालदार सदानंद परब, चंद्रकांत राऊत, सुनिल साळोखे, सूर्यकांत आंब्रे, पोलीस नाईक संदीप कांबळे, संदीप तळेकर, अजय बल्लाळ, ज्ञानेश्‍वर मिंडे, पोलीस शिपाई राजाराम पाटील, अनुपम जगताप यांनी तिथे अचानक छापा टाकला होता. यावेळी तिथे काळ्या तेलाने भरलेले १९५ ड्रम आणि १०० रिकामे ड्रम तसेच काही ड्रममधील पदार्थ खाडीत टाकलेले दिसून आले होते, या तेलामुळे तिथे प्रचंड उग्र वास येऊन डोळ्यांना त्रास तसेच पर्यावरणाला हानी पोहचत होते. त्यामुळे तिथे असलेल्या  मोहम्मद खलील, मोहम्मद अफजल, इरफान मंसुरी आणि स्वामीनारायण या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीत ते चौघेही तिथे काळ्या तेलावर प्रक्रिया करुन त्या तेलाची बाजारात विक्री करीत होते. उर्वरित तेल ते चौघेही खाडीत फेंकून देत होते.

 

 

या गुन्ह्यांत या चौघांचा सहभाग उघड होताच त्यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याविरुद्ध २७७, २७८, ३३६, २८५, ३४ भादवी सहकलम १५ (१) पर्यावरण संरक्षण कायदा कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अटकेनंतर या चौघांना नंतर मानखुर्द पोलिसांकडे सोपविण्यात आला असून त्यांची संबंधित पोलिसांकडून चौकशी सुरु असल्याचे पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांनी सांगितले.

 

 


Tags: furnace oilmuktpeethटाकावू काळे तेलमुक्तपीठ
Previous Post

“घटनात्मक पदावर बसून राज्यपालांचे घटनेच्या मारेकऱ्याचे काम”

Next Post

अटी-शर्ती मान्य करा, नाहीतर व्हॉट्सअप अकाऊंट होणार बंद! टेलीग्राम-सिग्नल चर्चेत!!

Next Post
WhatsApp Telegram Signal

अटी-शर्ती मान्य करा, नाहीतर व्हॉट्सअप अकाऊंट होणार बंद! टेलीग्राम-सिग्नल चर्चेत!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!