मुक्तपीठ टीम
ईडीने दोन नोटीसा बजावल्याने शुक्रवारी शिवसेना खासदार संजय राऊत चौकशीसाठी कार्यालयात हजर राहिले. मात्र, चौकशीला जाताना त्यांच्या स्टाईल्सची सर्वात जास्त चर्चा होत आहे. संजय राऊत हे पांढरा शर्ट आणि गळ्यात भगव्या रंगाचा उपरणं गुंडाळून ईडी कार्यालयात दाखल झाले. त्यापुर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी “ईडीवर माझा विश्वास आहे” असं मोठं वक्तव्य राऊतांनी केलं आहे.
‘मी खूप निर्भय माणूस आहे…’
- आज दुपारी १२ वाजता राऊतांनी ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे.
- राऊतांच्या घराबाहेर शिवसैनिकांनी गर्दी केली. राऊत हे सकाळी साडेअकरा वाजताच ईडी कार्यालयाजवळ पोहोचले.
- ईडी चौकशीला सामोरे जाण्याआधी ईडी कार्यालयाबाहेर राऊतांनी पत्रकारांच्या अनेक प्रश्नांना उत्तरं दिली.
- संजय राऊत यांनी ईडी कार्यालयाबाहेर प्रसारमाध्यमांना सांगितले की, ‘मी खूप निर्भय माणूस आहे कारण मी माझ्या आयुष्यात कधीही चूक केली नाही.’, ‘हे सर्व राजकीय आहे का ते नंतर कळेल. सध्या, मला वाटते की मी तटस्थ एजन्सीकडे जात आहे आणि माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे.
यापूर्वी संजय राऊतांचे ईडीला आव्हान!
- अलीकडेच संजय राऊत यांनी ईडीच्या कारवाईवरून केंद्र सरकारवर आरोप केला होता.
- हिंमत असेल तर मला अटक करा, गोळ्या घाला किंवा शिरच्छेद करा, पण ते गुवाहाटीला जाणार नाही, असे आव्हान त्याने ईडीला दिले होते.
- मात्र, उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राऊत यांचा सूर बदलला.
पत्राचाळ घोटाळा आहे तरी काय?
- मुंबईच्या पश्चिम उपनगरातील गोरेगावमध्ये पत्रा चाळ आहे.
- त्या चाळींच्या पुनर्विकासाच्या मोठ्या प्रकल्पासाठी खूप स्पर्धा होती.
- त्यात एचडीआयएलही सहभागी होती.
- ही पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प १०३४ कोटींचा असल्याचे समजते.
- याप्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना ईडीने यापूर्वीच अटक केली आहे.
- या प्रकरणी गेल्या आठवड्यात आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहे.
- राऊतांच्या मुलींच्या कंपनीत भागीदार असलेल्या सुजित पाटकर यांच्या घरावरही यापूर्वी ईडीने छापेमारी केली होती.
- शिवाय संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक खात्यातून केलेल्या ५५ लाखांच्या व्यवहाराप्रकरणी ईडीने नोटीस पाठवली होती.
- त्यानंतर संजय राऊत यांनी ते ५५ लाख परतही केले होते.
- या प्रकरणी त्यांची चौकशीही झाली.
- संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधवी राऊत आणि वर्षा राऊत यांच्यात झालेले आर्थिक व्यवहार ईडीच्या रडारवर आहेत.
- त्या व्यवहारातूनच हे प्रकरण थेट राऊतापर्यंत पोहचल्याचे समोर येत आहे.