मुक्तपीठ टीम
गेले अनेक महिने चर्चा होत असलेली शिवसेना नेते संजय राऊतांवरील ईडीची कारवाई अखेर रविवारी सुरु झाली. मुंबईच्या गोरेगावमधील पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणात नाव आल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाचे अधिकारी रविवारी सकाळी संजय राऊत यांच्या घरी पोहोचले. संजय राऊत यांना ताब्यात घेऊन, आवश्यकता भासल्यास अटक करूनही ईडी त्यांची चौकशी करू शकते, अशी शक्यता आहे. त्यांच्यावर तपासात सहकार्य न केल्याचा आरोप आहे. राऊतांच्या घराबाहेर शिवसैनिकांनी गर्दी केली असून भाजपा आणि ईडीविरोधात घोषणा देण्यात येत आहेत.
राऊतांचा शिवसेना न सोडण्याचा निर्धार!
ईडीकडून सुरू असलेल्या कारवाईदरम्यान संजय राऊत यांनी मात्र आपली भूमिका कायम असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे. “खोटी कारवाई…खोटे पुरावे…मी शिवसेना सोडणार नाही…मरेन पण शरण जाणार नाही…जय महाराष्ट्र!” अशा आशयांचे ट्वीट करत त्यांनी आपला लढण्याचा निर्धार कायम असल्याचे सांगितले आहे.
संजय राऊत यांच्या अटकेची शक्यता!
ईडी संजय राऊत यांना अटक करू शकते अशीही शक्यता आहे. त्यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात नेले जाऊ शकते. मुंबईच्या गोरेगावमधील १ हजार ३४ कोटी रुपयांच्या पत्रा चाळ घोटाळ्यात संजय राऊत यांची चौकशी सुरू आहे. तपास यंत्रणेने त्यांच्यावर तपासात सहकार्य न केल्याचा आरोप केला आहे. रविवारी सकाळी ईडीचे पथक मुंबईतील भांडुप येथील घरी पोहोचले.
संजय राऊत यांची ईडी चौकशी!
- यापूर्वी, सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना नव्याने समन्स बजावले होते.
- त्यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात २७ जुलै रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते.
- संसदेच्या अधिवेशनाचा हवाला देत राऊत केंद्रीय एजन्सीसमोर हजर झाले नव्हते.
- संजय राऊतांच्या वकिलांनी मुंबईत ईडी अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि राऊत यांना ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात हजर राहण्याची विनंती करणारी लेखी विनंती केली.
नव्या सरकारचा शपथविधी, राऊतांची चौकशी!
- शिवसेना नेत्याने काहीही चुकीचे केल्याचा इन्कार केला असून राजकीय सूडबुद्धीने आपल्याला लक्ष्य केले जात असल्याचा आरोप केला आहे.
- राऊत हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या वर्तुळातील विश्वासू नेते आहेत.
- गेल्या महिन्यात शिवसेनेतील बंडखोरीमुळे ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले होते.
- ३० जून रोजी बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यंमंत्रीपदाची शपथ घेतली.
- त्याचवेळी राऊत यांची ईडीने १ जुलै रोजी सुमारे १० तास चौकशी केली.
राज्यपालांच्या आक्षेपार्ह उद्गारांमुळे आजच कारवाई?
- शिवसेना नेत्यांचा आरोप आहे की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचा, मराठी माणसांचा अपमान केल्याने त्यांच्याविरोधात वातावरण तापले आहे.
- त्यापासून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी राऊतांविरोधातील कारवाईसाठी आजचा मुहूर्त निवडण्यात आला आहे.
राज्यपालांनी केलेला महाराष्ट्राचा अपमानावर संतप्त भावना मांडणारी मुक्तपीठची चर्चा नक्की पाहा:
संजय राऊतांची ईडी चौकशी होत आहे ते प्रकरण आहे काय?
वाचा: