Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

संजय राऊतांची जागा गजाआडच! भाजपा नेत्यांना असं का वाटतं?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
ED Raid At sanjay raut House

मुक्तपीठ टीम

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीचे पथक रविवारी सकाळी पोहोचले. मुंबईतील गोरेगाव भागातील पत्रा चाळ प्रकरणी त्यांच्यावर आरोप आहेत. त्याप्रकरणी चौकशी सुरू आहे. समन्सला प्रतिसाद न दिल्याने आणि तपासात सहकार्य न केल्याने ईडीचे पथक राऊत यांच्या घरी पोहोचल्याचे कळते. ईडीची चौकशी सुरु असतानाच राऊतांच्या अटकेचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यातही भाजपाचे नेते संजय राऊतांना गजाआड जावेच लागेल, असं बजावत आहेत.

राऊतांना मलिकांच्या शेजारी जावेच लागेल! – सोमय्या

  • भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले की, संजय राऊत यांच्या लुटमारीचे आणि माफियांचे पुरावे मी दिले आहेत.
  • महाविकास आघाडीचे सरकार त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते.
  • राज्यातील जनतेला लुटणाऱ्या संजय राऊत यांचा आज हिशोब होणार आहे.
  • शिवसेनेच्या खासदाराविरोधात मी पुरावे दिले आहेत.
  • माझा विश्वास आहे की राऊत यांनी नवाब मलिकच्या शेजारी जावेच लागेल. आता कारवाई सुरू आहे.
  • संजय राऊत पळत होते, आता हिशोब द्यावा लागेल.

कर नाही, तर डर कशाला? – राम कदम

  • भाजप आमदार राम कदम म्हणाले की संजय राऊत ईडीची चौकशी का टाळत होते?
  • कोणालाही सोडले जाणार नाही. कायदा त्याचे काम करणारच. राऊतांनी ईडीच्या प्रश्नांना आधी उत्तरे द्यायला हवी होती.
  • काळ्या-पांढऱ्यावर आलेल्या कागदपत्रांमुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
  • ईडी, सीबीआय कधीच अचानक कारवाई करत नाही.
  • त्यापूर्वी कागदपत्रे व इतर चौकशी केली जाते.
  • ईडी प्रश्न विचारत असेल तर उत्तरे द्यावीत.

रोज सकाळ खराब करणाऱ्याची सकाळ खराब झाली! – नितेश राणे

  • भाजपा आमदार नितेश राणे म्हणाले की, जे रोज सकाळी खराब करतात, त्यांची आज सकाळ खराब झाली याचे समाधान आहे. गोरेगावच्या पत्रा चाळीतील जनतेला आता न्याय मिळेल असे दिसते.
  • वाकणार नाही वगैरे म्हणणाऱ्यांना आता कळेल.
  • भ्रष्टाचार, महिलांवरील अत्याचार याबाबत आपल्याविरुद्ध काहीही होणार नाही, असे त्यांना वाटायचे. पण आता त्यांना कळेल.
  • त्यांना शिक्षा व्हायला हवी. तुम्ही कोणीही असाल, भ्रष्टाचाराची किंमत तुम्हाला चुकवावी लागेल, असे राणे म्हणाले. चौकशी होईल.

बाहेर पडण्याचा रस्ता शोधला पाहिजे – रावसाहेब दानवे

  • संजय राऊतांवरील ईडी कारवाईमागे राजकारण नाही.
  • संजय राऊतांविरोधात आरोप आहेत, त्यांनी स्पष्टीकरण दिले पाहिजे.
  • यामागे राजकारण नाही, केलेल्या कृत्यावर पांघरूण घालण्यासाठी भाजपावर आरोप केला जातो.
  • संजय राऊतांना आता बाहेर पडण्याचा मार्ग शोधला पाहिजे.

वाचा:

संजय राऊतांच्या घरी ईडी! अटकेची शक्यता!! समजून घ्या नेमकं काय, कसं आणि कधी घडतंय…

 


Tags: BhandupBJPEd Raid At Sanjay Raut HousemumbaiPatra Chawl Casesanjay rautShivsenaभाजपासंजय राऊत
Previous Post

संजय राऊतांच्या घरी ईडी! अटकेची शक्यता!! समजून घ्या नेमकं काय, कसं आणि कधी घडतंय…

Next Post

जीवनात सकारात्मक दृष्टिकोन शिकविणारा चित्रपट -फॉरेस्ट गम्प

Next Post
Forrest Gump

जीवनात सकारात्मक दृष्टिकोन शिकविणारा चित्रपट -फॉरेस्ट गम्प

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!