Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ब्रिटिश दारुगोळा वापरत सामनाने डागली मोदी सरकारवर तोफ! “सांगितलं स्वर्ग, बनवला नरक!”

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
samana

मुक्तपीठ टीम

 

शिवसेनेचं मुखपत्र दैनिक सामनाने आज मोदी सरकारवर तोफ डागण्यासाठी ‘द गार्डियन’ या ब्रिटिश दैनिकातील दारुगोळा वापरला आहे. ‘द गार्डियन’नं भारतात कोरोनामुळे नरकासारखी परिस्थिती झाल्याचं म्हटलं आहे. याच मुद्द्यांचा आधार घेत शिवसेनेनं सामना अग्रलेखातून मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे.

 

नेमकं काय म्हटले सामनाच्या अग्रलेखात?

मृत्यूंचे तांडव सुरुच…

• नाशिकपाठोपाठ मुंबई नजीकच्या विरार येथील एका कोरोना रुग्णालयाला आग लागून १३ रुग्णांचा गुदमरून, जळून मृत्यू झाला आहे.

• नाशिकमध्ये ऑक्सिजनच्या गळतीमुळे दोन दिवसांपूर्वी २९ जण प्राणास मुकले.

• त्याआधी भंडारा जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयास आग लागली व १० बालकांचा मृत्यू झाला.

• भांडुपच्या ‘ड्रीम’ मॉलमधील कोरोना सेंटरला लागलेल्या आगीतही ११ जणांना जीव गमवावे लागले.

• महाराष्ट्रात दुर्घटनांची मालिकाच सुरू झाली आहे.

• या मालिकांचा शेवट काय ते कोणीच सांगू शकत नाही, पण कोरोनामुळे महाराष्ट्र व देश एका दुष्टचक्रात सापडला आहे हे नक्की.

• नाशिकच्या दुर्घटनेच्या तपासासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन झाल्याचे वृत्त ताजे असतानाच विरारच्या रुग्णालयातील आगीच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

• एकंदरीत अशा दुर्घटनांनी सर्वत्र आक्रोश व भयाचेच वातावरण निर्माण झाले आहे.

• कोरोनाच्या रुग्णांना बेड व प्राणवायू मिळत नाही, याची बोंब सुरू असताना जागोजागी कोरोना रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागांना आगी लागून रुग्णांचे होरपळून मरण पावणे म्हणजे त्यांना जिवंतपणी भडकत्या चितेवर ढकलण्यासारखेच आहे.

 

न्यायालयांना अलीकडे उशिराने सोयीनुसार जाग येते

• देशातील कोरोनाची स्थिती हाताबाहेर गेल्याचे जगानेच मान्य केल्यामुळे देशाचे सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय काय म्हणतेय याकडे लक्ष देण्याची गरज नाही.

• कारण न्यायालयांना अलीकडे उशिराने सोयीनुसार जाग येते.

• कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती आहे व या आपत्तीशी लढण्यासाठी केंद्र सरकारने काय योजना आखली आहे, याची माहिती सर्वोच्च न्यायालयाने आता मागितली आहे.

• देशातील गंभीर कोरोनास्थितीची सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेतली. याचा आनंद आहे.

कोरोनाने भारताचा नरक केल्याची परदेशात टीका

• पश्चिम बंगालातील राजकीय पुढाऱ्यांचे, पंतप्रधान, गृहमंत्र्यांचे आणि हरिद्वारमधील धार्मिक मेळे यांची दखल सर्वोच्च न्यायालयाने योग्यवेळी घेतली असती तर लोकांना असे रस्त्यावर तडफडून मरण्याची वेळ आली नसती.

• दिल्लीतील एका गंगाराम रुग्णालयामध्ये प्राणवायूचा दाब कमी झाल्यामुळे चोवीस तासांत २५ कोरोना रुग्ण मरण पावले. ही देशाच्या राजधानीची स्थिती आहे.

• या स्थितीस देशाचे केंद्रीय सरकार जबाबदार नसेल तर कोण जबाबदार आहे?

• भारत हा कोरोनाचा नरक बनला आहे असे आता परदेशी वृत्तपत्रांत प्रसिद्ध होऊ लागले आहे.

• त्यामुळे पंतप्रधान मोदी यांची विदेशात काय प्रतिष्ठा राहिली? कोरोना संसगनि भारतातील यंत्रणा इतकी कोलमडली आहे की, कोरोनाने हिंदुस्थानचा पार नरक केला आहे अशी जहाल टीका ‘ब्रिटन’चे प्रतिष्ठात्त वृत्तपत्र ‘दि गार्डियन’ने केली आहे.

• रोज लाखांवर कोरोना रुग्ण सापडत असताना पंतप्रधान मोदी यांच्यासह केंद्र सरकारने या संकटाकडे दुर्लक्ष केले.

• सत्ताधाऱ्यांचा हाच फाजील आत्मविश्वास कोरोना वाढीस कारणीभूत ठरला असे ‘फटकारे’ ‘गार्डियन’ने मारले आहेत.

• देशात सध्या जो हाहाकार माजला आहे त्याचे खापर राज्यांवर फोडण्याऐवजी केंद्र सरकारच्या धुरिणांनी आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे.

• देशातील आरोग्य यंत्रणेने कोरोनाच्या संकटाला पराभूत केल्याचा खोटा आभास निर्माण केला, पण दुसरी लाट येणार व ती भयंकर असणार याची सूचना असतानाही केंद्र सरकारने आत्मनिर्भर होण्यासाठी काय केले? हा प्रश्नच आहे.

अच्छे दिनचे वचन, रुग्णांना बेडही नाही!

• पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामीळनाडूसारख्या राज्यांतील निवडणुकांकडे झोपून लक्ष देण्याऐवजी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेकडे लक्ष दिले असते, तर भारतावर कोरोनाच्या नरकात पडण्याची वेळ आली नसती.

• गुजरात व उत्तर प्रदेशसारख्या राज्यांत कोरोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या लपवून ठेवण्यात आली.

• शवागारात मृतदेह लपवून ठेवले तरी नंतर स्मशानात सामुदायिक चिता पेटल्याच.

• अच्छे दिन आणू असे वचन देणाऱ्यांच्या राज्यात रुग्णांना बेड नाहीत, ऑक्सिजन नाही, लस आणि औषधे नाहीत.

 

स्वर्ग तर नाही स्मशान आणि कबरस्तान!

• फक्त तडफड आणि मनस्ताप आहे
• नाशिक, वसई, विरार, भांडुप, भंडाऱ्यातील रुग्णालयात आगी लागून प्राणहानी झाली हे वास्तव आहे, पण अशी रुग्णालये घाईघाईत उभी करून त्यात रुग्णांना दाखल करावे लागले हाच खरा नरक आहे.
• देशाचा कारभार रामभरोसे चालला आहे, असे ताशेरे दिल्लीच्या उच्च न्यायालयाने मारले.
• सर्वोच्च न्यायालयानेही जाता जाता केंद्राला धारेवर धरले.
• केंद्राकडे राष्ट्रीय योजना काही असेल तर ती सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने काढले आहेत.
• त्याने काय होणार? मोदी व त्यांच्या सहकाऱ्यांना देशाचा स्वर्गच बनवायचा होता.
• त्यासाठीच त्यांनी मते मागितली, पण आता देशाचे स्मशान आणि कब्रस्तान होताना दिसत आहे.
• कोठे सामुदायिक चिता पेटत आहेत, कोठे रुग्णालये स्वतच रुग्णांसह पेट घेत आहेत! अच्छे दिन, स्वर्ग दूरच राहिला, पण नरक तो हाच काय? असाच प्रश्न देशाची सध्याची भयावह स्थिती पाहिल्यावर पडतो.


Tags: samanaखासदार संजय राऊतशिवसेनासामना अग्रेलख
Previous Post

#मुक्तपीठ शनिवारचे गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र

Next Post

अखेर अनिल देशमुखांविरोधात गुन्हा, आता पुढचं पाऊल ईडीचं?

Next Post
anil deshmukh

अखेर अनिल देशमुखांविरोधात गुन्हा, आता पुढचं पाऊल ईडीचं?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!