Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अखेर अनिल देशमुखांविरोधात गुन्हा, आता पुढचं पाऊल ईडीचं?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
anil deshmukh

मुक्तपीठ टीम

 

महावसुलीच्या आरोपामुळे गृहमंत्रीपदावरुन पायउतार झालेल्या अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या आरोपांप्रकरणी सीबीआयने अनिल देशमुखांवर कारवाई केली आहे. त्याचबरोबर देशमुखांशी संबंधित विविध ठिकाणांवर छापेमारीस सुरुवात केली आहे. अनिल देशमुखांसह इतरांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीबीआयने गुन्हा दाखल केलेली रक्कम ही शंभर कोटींसारखी प्रचंड मोठी असल्याने स्वाभाविकच आता ईडीचाही याप्रकरणात प्रवेश होणे निश्चित मानले जात आहे.

 

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआय गेले १५ दिवस या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करत होती. यादरम्यान, ७ ते ८ जणांचा जबाब नोंदवला होता. तसेच अनिल देशमुखांचीही चौकशी करुन जबाब नोदंविण्यात आला होता. प्राथमिक चौकशीनंतर एक अहवाल तयार करुन सीबीआयच्या वरिष्ठांकडे सदर करण्यात आला. त्यानंतर सीबीआयने अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल करण्याचे मोठे पाऊल उचलले आहे.

आतापर्यंत काय झाले?

  • उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती.
  • याप्रकरणी पोलीस आधिकारी सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली.
  • यानंततर याप्रकरणाला वेगवेगळी वळणं मिळण्यास सुरुवात झाली.
  • याच दरम्यान परमबीर सिंह यांची पोलीस आयुक्त पदावरुन उचल बांगडी करण्यात आली.
  • त्यावेळी सिंह यांच्याकडून तपासात गंभीर चुका झाल्याचे अनिल देशमुख यांनी म्हटले होते.
  • त्यानंतर सिंह यांनी अनिल देशमुखांनी पोलिसांना १०० कोटींच्या वसूलीचे टार्गेट दिल्याचा आरोप करणारा लेटर बॉम्ब टाकला होता.
  • याप्रकरणी परमबीर सिंह यांनी आधी सर्वोच्च न्यायालयात आणि त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाची पायरी चढली होती.
  • मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले होते.
  • त्यानंतर सीबीआयने प्रकरणाचा तपास सुरू केला होता.
  • तर आज सीबीआयने अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल केला आहे.

Tags: anil deshmukhCBIparambir singhमुंबई उच्च न्यायालयसीबीआय
Previous Post

ब्रिटिश दारुगोळा वापरत सामनाने डागली मोदी सरकारवर तोफ! “सांगितलं स्वर्ग, बनवला नरक!”

Next Post

ऊर्जामंत्र्यांची जलद कृती, २४ तासात पोलाद कंपनीला वाढीव वीज, १५ टन ऑक्सिजन मिळणार!

Next Post
nitin raut

ऊर्जामंत्र्यांची जलद कृती, २४ तासात पोलाद कंपनीला वाढीव वीज, १५ टन ऑक्सिजन मिळणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!