Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘मावळा’ संजय पवारांचं संभाजी छत्रपतींना सांगणं, “मराठा मावळा हरल्याचे पोस्टर्स दुर्दैवी!”

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
sanjay pawar replies sambhajiraje chhatrapati

मुक्तपीठ टीम

राज्यसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार संजय पवार यांचा पराभव शिवसेनेला धक्का देणारा होता. संजय पवार यांचा पराभव झाल्यानंतर त्यांना मिळालेल्या उमेदवारीच्या जागी अपक्ष उमेदवारीसाठी प्रयत्न केलेल्या संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेवर टीका केली, तसेच मावळा हरल्याचे पोस्टर काही भागात लावण्यात आले होते. यावर प्रतिक्रिया देताना संजय पवार म्हणाले की, निवडणुकीनंतर झालेला हा प्रकार दुर्दैवी आहे. “मराठा मावळा हरला” असे पोस्टर लावणे अत्यंत दुर्दैवी आहे, असं म्हटलं आहे. तसेच संभाजीराजे हे आमचे छत्रपती आहेत. मात्र शिवसेनेवरील टीका खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा दिला आहे.

मावळा हरल्याचे पोस्टर लावणं दुर्दैवी!

  • “कोल्हापूरचे संजय पवार हे अनेक वर्ष जिल्हाप्रमुख आहेत, कडवट शिवसैनिक आहेत. ते पक्के मावळे असून मावळे असतात म्हणून राजे असतात. पक्षनेते, पदाधिकारी हे मावळ्यांच्या जोरावर उभे असतात,” असंही संजय राऊत यांनी त्यांची उमेदवारी जाहीर करताना सांगितलं होतं.
  • मात्र राज्यसभा निवडणुकीत भाजपाच्या धनंजय महाडिकांनी संजय पवारांचा पराभव केला आहे.
  • संजय राऊत यांच्या वक्तव्याचा धागा पकडत मावळा हरल्याचे पोस्टर काही भागात लावण्यात आले होते.
  • त्यावरुच आता संजय पवार यांनी असे पोस्टर्स लागणं दुर्दैवी असल्याचं म्हटले आहे.

शिवसेनेवरची टीका खपवून घेतली जाणार नाही!

  • संजय पवारांच्या पराभवानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली होती.
  • आता संभाजीराजे छत्रपतींच्या त्या टीकेवर आता संजय पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
  • संजय पवार म्हणाले, ‘संभाजीराजे हे आमचे छत्रपती आहेत.
  • मात्र त्यांची शिवसेनेवरची टीका खपवून घेतली जाणार नाही.
  • शिवसेनेकडे तुम्ही मते मागायला आला होता.
  • शिवसेनेचे वाघ हे जंगलातील आहेत, सर्कशीतील नाही.
  • राज्यसभा निवडणुकीत कुठे दगाफटका झाला, त्याचा शोध वरिष्ठ घेत आहेत’.

शिवसेनेचे कोल्हापूरात जोरदार काम सुरू ठेवणार!

  • राज्यसभेत पराभूत झाल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फोन करून आधार दिल्याचे संजय पवारांनी सांगितले.
  • तसेच इथून पुढे शिवसेनेचे कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार काम सुरू ठेवणार असल्याचेही संजय पवारांनी सांगितले.

Tags: KolhapurRajyasabha ElectionSambhajiraje ChhatrapatiSanjay PawarShivsenaकोल्हापूरमराठा मावळा हरला पोस्टर्सराज्यसभा निवडणूकशिवसेनासंजय पवारसंभाजी छत्रपती
Previous Post

नेत्यांनी ऐकावं असं महिला बॉक्सरचं भारतीयत्व: “एका धर्माचं नाही, देशाचं प्रतिनिधित्व करते!”

Next Post

कोकण भूमीत स्त्री साहित्य प्रतिभेचा संगम

Next Post
कोकण भूमीत स्त्री साहित्य प्रतिभेचा संगम

कोकण भूमीत स्त्री साहित्य प्रतिभेचा संगम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!