Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नेत्यांनी ऐकावं असं महिला बॉक्सरचं भारतीयत्व: “एका धर्माचं नाही, देशाचं प्रतिनिधित्व करते!”

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Nikhat Zareen

मुक्तपीठ टीम

कॉमनवेल्थ गेम्समध्ये बॉक्सिंगमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी वर्ल्ड चॅम्पियन निखत झरीन आणि लोव्हलिना बोरगोहेन यांची निवड करण्यात आली आहे. याआधी निखत झरीनने भारताला विश्व अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकही पटकावून दिले आहे. दरम्यान झरीन सध्या वेगळ्या गोष्टींमुळेही चर्चेत आहे. झरीनला एका मुलाखतीमध्ये विचारण्यात आले की, लोकं तिची मेहनत आणि रिंगमधील कामगिरीपेक्षा तिच्या धार्मिक पार्श्वभूमीबद्दल अधिक बोलतात, तेव्हा तिने सांगितले की, ” ‘हिंदू-मुस्लिम’चा मला काही फरक पडत नाही. एक खेळाडू म्हणून मी भारताचे प्रतिनिधित्व करते.

खेळाडू म्हणून भारताचे प्रतिनिधित्व करते…

  • पुराणमतवादी समाजातून आलेल्या झरीनला बॉक्सिंगमध्ये करिअर करण्यासाठी सामाजिक पूर्वग्रहांना सामोरे जावे लागले.
  • पण या २५ वर्षीय खेळाडूने स्पष्ट केले की ती कोणत्याही विशिष्ट समुदायासाठी नाही तर भारतासाठी खेळते आणि जिंकते.
  • तिने सांगितले की, “हिंदू-मुस्लिम आणि अन्य कोणत्याही गोष्टींचा मला काही फरक पडत नाही.
  • एक खेळाडू म्हणून मी भारताचे प्रतिनिधित्व करते.
  • मला ‘हिंदू-मुस्लिम’ या वादात पडायचे नाही आणि मला त्या गोष्टींचा काही फरक पडत नाही.
  • मी कोणत्याही समुदायाचे प्रतिनिधित्व करत नाही, मी देशाचे प्रतिनिधित्व करते आणि देशासाठी पदक जिंकून मला आनंद होतो.”

खेळाडूंना मानसिक दबाव हाताळण्यासाठी प्रशिक्षित करणे आवश्यक!

  • इंडियन वुमेन्स प्रेस कॉर्प्स (IWPC) ने आयोजित केलेल्या संभाषणात जेव्हा निखतला विचारण्यात आले की भारतीय बॉक्सर्सची कुठे कमतरता आहे, तेव्हा तिने सांगितले की, भारतीय बॉक्सर्स खूप प्रतिभावान आहेत, आम्ही कोणापेक्षा कमी नाही.
  • आमच्याकडे ताकद, वेग आणि आवश्यक कौशल्ये सर्व काही आहे.
  • तुम्ही एकदा जागतिक स्तरावर पोहोचलात की खेळाडूंना मानसिक दबाव हाताळण्यासाठी प्रशिक्षित करणे आवश्यक आहे.

झरीन राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणार!

  • तिने पुढे सांगितले की, मोठ्या टप्प्यावर पोहोचल्यानंतर अनेक खेळाडू दडपणाखाली येतात आणि त्यांना चांगली कामगिरी करता येत नाही.
  • गेल्या महिन्यात ‘फ्लायवेट’ स्पर्धेत जगज्जेते ठरलेल्या झरीन २८ जुलैपासून इंग्लंडमध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे.

Tags: hindu-muslimIndiaNikhat Zareenनिखत झरीनभारतहिंदू-मुस्लिम वाद
Previous Post

डीआरडीओ आरएसीत शास्त्रज्ञांच्या ५८ जागांवर संधी, २८ जूनपर्यंत अर्ज करा

Next Post

‘मावळा’ संजय पवारांचं संभाजी छत्रपतींना सांगणं, “मराठा मावळा हरल्याचे पोस्टर्स दुर्दैवी!”

Next Post
sanjay pawar replies sambhajiraje chhatrapati

'मावळा' संजय पवारांचं संभाजी छत्रपतींना सांगणं, "मराठा मावळा हरल्याचे पोस्टर्स दुर्दैवी!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!