मुक्तपीठ टीम
राज्यसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार संजय पवार यांचा पराभव शिवसेनेला धक्का देणारा होता. संजय पवार यांचा पराभव झाल्यानंतर त्यांना मिळालेल्या उमेदवारीच्या जागी अपक्ष उमेदवारीसाठी प्रयत्न केलेल्या संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेवर टीका केली, तसेच मावळा हरल्याचे पोस्टर काही भागात लावण्यात आले होते. यावर प्रतिक्रिया देताना संजय पवार म्हणाले की, निवडणुकीनंतर झालेला हा प्रकार दुर्दैवी आहे. “मराठा मावळा हरला” असे पोस्टर लावणे अत्यंत दुर्दैवी आहे, असं म्हटलं आहे. तसेच संभाजीराजे हे आमचे छत्रपती आहेत. मात्र शिवसेनेवरील टीका खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा दिला आहे.
मावळा हरल्याचे पोस्टर लावणं दुर्दैवी!
- “कोल्हापूरचे संजय पवार हे अनेक वर्ष जिल्हाप्रमुख आहेत, कडवट शिवसैनिक आहेत. ते पक्के मावळे असून मावळे असतात म्हणून राजे असतात. पक्षनेते, पदाधिकारी हे मावळ्यांच्या जोरावर उभे असतात,” असंही संजय राऊत यांनी त्यांची उमेदवारी जाहीर करताना सांगितलं होतं.
- मात्र राज्यसभा निवडणुकीत भाजपाच्या धनंजय महाडिकांनी संजय पवारांचा पराभव केला आहे.
- संजय राऊत यांच्या वक्तव्याचा धागा पकडत मावळा हरल्याचे पोस्टर काही भागात लावण्यात आले होते.
- त्यावरुच आता संजय पवार यांनी असे पोस्टर्स लागणं दुर्दैवी असल्याचं म्हटले आहे.
शिवसेनेवरची टीका खपवून घेतली जाणार नाही!
- संजय पवारांच्या पराभवानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली होती.
- आता संभाजीराजे छत्रपतींच्या त्या टीकेवर आता संजय पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
- संजय पवार म्हणाले, ‘संभाजीराजे हे आमचे छत्रपती आहेत.
- मात्र त्यांची शिवसेनेवरची टीका खपवून घेतली जाणार नाही.
- शिवसेनेकडे तुम्ही मते मागायला आला होता.
- शिवसेनेचे वाघ हे जंगलातील आहेत, सर्कशीतील नाही.
- राज्यसभा निवडणुकीत कुठे दगाफटका झाला, त्याचा शोध वरिष्ठ घेत आहेत’.
शिवसेनेचे कोल्हापूरात जोरदार काम सुरू ठेवणार!
- राज्यसभेत पराभूत झाल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फोन करून आधार दिल्याचे संजय पवारांनी सांगितले.
- तसेच इथून पुढे शिवसेनेचे कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार काम सुरू ठेवणार असल्याचेही संजय पवारांनी सांगितले.