Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

लंडनमध्ये प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांना ‘एशियन युके एक्सलन्स अवॉर्ड-२०२२’

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Pvt. Dr. Sanjay b. Chordia

मुक्तपीठ टीम

सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांना लंडनच्या संसद भवन येथील मानाचा ‘एशियन युके एक्सलन्स अवॉर्ड २०२२’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. लंडनचे खासदार वीरेंद्र शर्मा, नवेंडू मिश्रा व राडांक इंटरनॅशनल मिडिएटर एक्सपर्ट या संस्थेच्या संस्थापक डॉ. रेणू राज यांच्या हस्ते त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.

सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने समग्र व शाश्वत विकासाच्या क्षेत्रात युवकांना उत्तम शिक्षण जागतिक बाजारात योगदान देऊ शकतील अशी युवापिढी घडविण्याचे काम केले आहे. याच भरीव कामगिरीबद्दल डॉ. चोरडिया यांना नुकत्याच झालेल्या ‘एशियन युके बिझनेस समिट २०२२’मध्ये सन्मानित करण्यात आले. यावेळी भारतासह लंडन, जपान, आयर्लंड, मॉरिशियस, ऑस्ट्रेलिया अन्य देशांचे मान्यवर उपस्थित होते. सामाजिक, सांस्कृतिक, शिक्षण अशा विविध क्षेत्रातील भरीव कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना या सन्मानाने गौरविण्यात आले.

या उत्तम कामगिरीबद्दल सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या संपूर्ण टीमचे आयोजक व मान्यवरांनी अभिनंदन केले. व्यवसायाच्या संधी आणि भारत व लंडन यांच्यातील संबंध अजून दृढ करण्यासाठी हा सोहळा एक मोठी संधी असते. त्यामुळे या आंतरराष्ट्रीय सोहळ्यात सहभागी होणे हे सूर्यदत्त परिवारासाठी सन्मानाची बाब होती. जगभरातून निमंत्रित करण्यात आलेल्या मोजक्या व्यक्तींमध्ये प्रा. डॉ. चोरडिया यांचा समावेश होता.

डॉ. चोरडिया यांच्या दूरदृष्टी, समर्पण, अथक प्रयत्नांमुळेच ‘सूर्यदत्त’ची वाढ झाली आहे. नाविन्यपूर्ण शिक्षणातील जागतिक दर्जाचे केंद्र बनले आहे. पाश्चिमात्य बाह्यदर्शनासह जागतिक दर्जाचे ज्ञानकेंद्र, नाविन्यपूर्ण, मूल्याधारित शिक्षण याची सांगड घातली गेली आहे. ‘सीएसआर’मधील त्यांचे योगदान व दर्जेदार शिक्षणासाठी आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी सहयोग कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार वीरेंद्र शर्मा यांनी काढले.

प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी पुरस्कार स्वीकारत हा सन्मान आनंददायी असल्याची भावना व्यक्त केली. प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “एवढ्या दिग्गज मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारताना आनंद होत आहे. पुढील काळातही लंडनच्या विद्यापीठांबरोबर विद्यार्थी हिताच्या दृष्टिकोनातून काही काम करण्याची इच्छा आहे. हा पुरस्कार संस्थेचे सर्व भागीदार, कुटुंबीय, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी यांचा आहे. त्यांचे परिश्रम, समर्पण, प्रामाणिकपणा याचे कौतुक केले पाहिजे. सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी दर्जेदार शिक्षण देऊन जागतिक बाजारपेठेसाठी अब्जाधीशांना आकार देण्यासाठी जागतिक मान्यता मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

पाहा व्हिडीओ:


Tags: Asian UK Excellence Award-2022good newsLondonLondon Parliament HousemuktpeethPvt. Dr. Sanjay b. ChordiaSuryadatta Education FoundationSuryadatta Group of Institutesएशियन युके एक्सलन्स अवॉर्ड-२०२२चांगली बातमीप्रा. डॉ. संजय बी. चोरडियामुक्तपीठलंडनलंडन संसद भवनसूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनसूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट
Previous Post

पंतप्रधान ३० मे रोजी ‘पीएम-केअर्स फॉर चिल्ड्रेन’ शिष्यवृत्ती जारी करणार!

Next Post

जळगावात राष्ट्रीय आरोग्य अभियानात वैद्यकीय पदांवर भरती, अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस

Next Post
nhm

जळगावात राष्ट्रीय आरोग्य अभियानात वैद्यकीय पदांवर भरती, अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!