मुक्तपीठ टीम
सॅमसंगने बजेट सेगमेंट स्मार्टफोन गॅलॅक्सी एम१३ ४जी आणि ५जी भारतात लाँच केला आहे. एम१३ सॅमसंगने ४जी आणि ५जी या दोन्ही पर्यायांमध्ये लाँच केला आहे. या फोनमध्ये १२जीबी पर्यंत रॅम, ६०००एमएएच बॅटरी आणि ५० मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आहे.
सॅमसंग गॅलॅक्सी एम१३ ४जी/५जी चे फिचर्स…
- सॅमसंग गॅलॅक्सी एम१३ ४जी
- सॅमसंग गॅलॅक्सी एम१३ ४जी वेरिएंटमध्ये ६.६ इंचाचा एफ एचडी+ डिस्प्ले आहे.
- या स्मार्टफोनमध्ये एक्सीनोस ८५० प्रोसेसर वापरला आहे.
- या स्मार्टफोनमध्ये कंपनीने ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे.
- या स्मार्टफोनचा प्रायमरी कॅमेरा ५० मेगापिक्सल्सचा आहे.
- फ्रंटमध्ये ८-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.
- या स्मार्टफोनचा रॅम १२जीबी पर्यंत वाढवू शकता.
- हा स्मार्टफोन १२८जीबी इंटरनल स्टोरेज आहे.
सॅमसंग गॅलॅक्सी एम१३ ५जी
- सॅमसंग गॅलॅक्सी एम१३ ५जी वेरिएंटमध्ये ६.५ इंचाचा डिस्प्ले एफ एचडी+ डिस्प्ले आहे.
- या स्मार्टफोनमध्ये मिडियाटेक डायमेंसीटी ७०० प्रोसेसर वापरला आहे.
- या स्मार्टफोनच्या मागील बाजूस, ड्युअल कॅमेरा सेटअप आहे.
- या स्मार्टफोनचा प्रायमरी कॅमेरा ५० मेगापिक्सल्सचा आहे.
- या स्मार्टफोनची रॅम १२जीबी पर्यंत वाढवू शकता.
- कंपनीने या स्मार्टफोनमध्ये ५,००० एमएएच ची बॅटरी आहे.
सॅमसंग गॅलॅक्सी एम१३ ४जी/५जी ची किंमत
- सॅमसंग गॅलॅक्सी एम१३ ४जी
- सॅमसंग गॅलॅक्सी एम१३ ४जी ४जीबी रॅम आणि ६४जीबी इंटरनल स्टोरेज वेरिएंट ची किंमत ११,९९९ आहे.
- ६जीबी रॅम आणि १२८जीबी इंटरनल स्टोरेज वेरिएंट ची किंमत १३,९९९ आहे.
सॅमसंग गॅलॅक्सी एम१३ ५जी
- सॅमसंग गॅलॅक्सी एम१३ ५जी व्हेरिएंटच्या बेस ४जीबी रॅम आणि ६४जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १३,९९९ आहे
- ६जीबी रॅम आणि १२८जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १५,९९९ आहे.
- २३ जुलैपासून हा फोन अॅमेझॉनवरून हा स्मार्टफोन खरेदी करू शकाता.
- हा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी आयसी आयसी आय बँकेचे कार्ड वापरल्यास १,००० रुपयांची सूट मिळेल.