Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सॅमसंग गॅलेक्सी एफ१३ स्मार्टफोन स्वस्तात मस्त, बॅटरीची क्षमता जबरदस्त!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
Samsung Galaxy F13

मुक्तपीठ टीम

सॅमसंगने आपला नवीन स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी एफ१३ भारतात लॉंच केला आहे. हा फोन दोन व्हेरिएंटमध्ये लॉंच करण्यात आला आहे. ४ जीबी + ६४ जीबी आणि ४ जीबी + १२८ जीबी असे हे दोन प्रमुख व्हेरिएंट आहेत. ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ११ हजार ९९९ रुपये आहे. त्याच वेळी, फोनच्या १२८ जीबी स्टोरेज वेरिएंटसाठी १२,९९९ रुपये मोजावे लागतील. फोनची विक्री २९ जून रोजी दुपारी १२ वाजता सुरू होईल.

लॉंच ऑफर अंतर्गत, कंपनी या फोनवर १ हजार रुपयांची सूट देखील देईल. या सवलतीसाठी, आयसीआयसीआय बँक कार्डद्वारे पैसे द्यावे लागतील. डिस्काउंटसह, फोनचा ६४ जीबी व्हेरिएंट १० हजार ९९९ रुपयांना मिळेल. ६ हजार एमएएच बॅटरीने सुसज्ज असलेल्या या फोनमध्ये रॅम प्लस फीचर देखील मिळेल. या फीचरच्या मदतीने ४ जीबी रॅम असलेल्या फोनमध्ये ८ जीबी रॅमची कार्यक्षमता अनुभवता येईल.

सॅमसंग गॅलेक्सी एफ१३ फिचर्स

  • फोनमध्ये, कंपनी १०८०x२४०८ पिक्सेल रिझोल्यूशनसह ६.६ इंचाचा फुल एचडी + डिस्प्ले देत आहे.
  • फोनमध्ये दिलेला हा डिस्प्ले ६० एचझेडच्या रिफ्रेश रेटसह येतो.
  • कंपनीने हा फोन ४ जीबी रॅम आणि १२८ जीबीपर्यंत स्टोरेज पर्यायामध्ये लॉंच केला आहे. फोनमध्ये रॅम प्लस फिचर देण्यात आले आहे, ज्यामुळे गरज पडल्यास फोनची रॅम ८ जीबी होते.
  • कंपनी या फोनमध्ये प्रोसेसर म्हणून Exynos ८५० चिपसेट देत आहे, जो १ टीबीपर्यंत मायक्रो एसडी कार्डला सपोर्ट करतो.
  • फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे पाहायला मिळतील.
  • यामध्ये ५० मेगापिक्सेल प्रायमरी सेन्सरसह ५ मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल सेन्सर आणि २ मेगापिक्सेल डेप्थ सेन्सरचा समावेश आहे. त्याच वेळी, सेल्फीसाठी या फोनमध्ये ८-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल.

कंपनी या फोनमध्ये एक खास ऑटो डेटा स्विचिंग फीचर देखील देत आहे. प्रायमरी सिममध्ये नेटवर्क नसले तरीही हे फिचर यूजर्सना सेकंडरी सिमद्वारे डेटाद्वारे कनेक्ट ठेवेल. सॅमसंग गॅलेक्सी एफ१३ हा या फीचरसह येणारा सेगमेंटमधील पहिला स्मार्टफोन आहे. फोनमध्ये ६ हजार एमएएच बॅटरी आहे, जी १५ वॅट अडॅप्टिव्ह फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

पाहा व्हिडीओ:


Tags: battery capacitygood newsmuktpeethsamsung galaxy f13samsung galaxy smartphoneचांगली बातमीबॅटरीची क्षमतामुक्तपीठसॅमसंग गॅलेक्सी एफ१३सॅमसंग गॅलेक्सी स्मार्टफोन
Previous Post

अन्न प्रक्रिया क्षेत्रात सरकारी मदतीने उद्योग उभारण्यासाठी २७ जूनपासून अर्ज करा!

Next Post

हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये इंजिनीअरिंग आणि इतर उमेदवारांसाठी करिअर संधी

Next Post
Hindustan Petroleum

हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये इंजिनीअरिंग आणि इतर उमेदवारांसाठी करिअर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!