मुक्तपीठ टीम
सॅमसंगने आपला नवीन स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी एफ१३ भारतात लॉंच केला आहे. हा फोन दोन व्हेरिएंटमध्ये लॉंच करण्यात आला आहे. ४ जीबी + ६४ जीबी आणि ४ जीबी + १२८ जीबी असे हे दोन प्रमुख व्हेरिएंट आहेत. ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ११ हजार ९९९ रुपये आहे. त्याच वेळी, फोनच्या १२८ जीबी स्टोरेज वेरिएंटसाठी १२,९९९ रुपये मोजावे लागतील. फोनची विक्री २९ जून रोजी दुपारी १२ वाजता सुरू होईल.
लॉंच ऑफर अंतर्गत, कंपनी या फोनवर १ हजार रुपयांची सूट देखील देईल. या सवलतीसाठी, आयसीआयसीआय बँक कार्डद्वारे पैसे द्यावे लागतील. डिस्काउंटसह, फोनचा ६४ जीबी व्हेरिएंट १० हजार ९९९ रुपयांना मिळेल. ६ हजार एमएएच बॅटरीने सुसज्ज असलेल्या या फोनमध्ये रॅम प्लस फीचर देखील मिळेल. या फीचरच्या मदतीने ४ जीबी रॅम असलेल्या फोनमध्ये ८ जीबी रॅमची कार्यक्षमता अनुभवता येईल.
सॅमसंग गॅलेक्सी एफ१३ फिचर्स
- फोनमध्ये, कंपनी १०८०x२४०८ पिक्सेल रिझोल्यूशनसह ६.६ इंचाचा फुल एचडी + डिस्प्ले देत आहे.
- फोनमध्ये दिलेला हा डिस्प्ले ६० एचझेडच्या रिफ्रेश रेटसह येतो.
- कंपनीने हा फोन ४ जीबी रॅम आणि १२८ जीबीपर्यंत स्टोरेज पर्यायामध्ये लॉंच केला आहे. फोनमध्ये रॅम प्लस फिचर देण्यात आले आहे, ज्यामुळे गरज पडल्यास फोनची रॅम ८ जीबी होते.
- कंपनी या फोनमध्ये प्रोसेसर म्हणून Exynos ८५० चिपसेट देत आहे, जो १ टीबीपर्यंत मायक्रो एसडी कार्डला सपोर्ट करतो.
- फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे पाहायला मिळतील.
- यामध्ये ५० मेगापिक्सेल प्रायमरी सेन्सरसह ५ मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल सेन्सर आणि २ मेगापिक्सेल डेप्थ सेन्सरचा समावेश आहे. त्याच वेळी, सेल्फीसाठी या फोनमध्ये ८-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल.
कंपनी या फोनमध्ये एक खास ऑटो डेटा स्विचिंग फीचर देखील देत आहे. प्रायमरी सिममध्ये नेटवर्क नसले तरीही हे फिचर यूजर्सना सेकंडरी सिमद्वारे डेटाद्वारे कनेक्ट ठेवेल. सॅमसंग गॅलेक्सी एफ१३ हा या फीचरसह येणारा सेगमेंटमधील पहिला स्मार्टफोन आहे. फोनमध्ये ६ हजार एमएएच बॅटरी आहे, जी १५ वॅट अडॅप्टिव्ह फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.