मुक्तपीठ टीम
सॅमसंगने मागील वर्षी दक्षिण कोरियात लाँच केलेला नवीन लॅपटॉप गलेक्सी बुक फ्लेक्स २ 5G या वर्षाच्या मध्यास भारतातही मिळू लागला. जबरदस्त कॅमेरा आणि एस-पेन सपोर्ट सोबत येतो. यात ५जी वेरिएंटमध्ये सेल्यूलर कनेक्टिविटी सुद्धा दिली आहे. हा २-इन-१ लॅपटॉप टेकप्रेमींच्या पसंतीस उतरत आहे.
लॅपटॉप बॉक्समध्ये काय मिळते?
- लॅपटॉप आणि एसी अॅडेप्टरसोबत येतो.
- सोबतच क्विक स्टार्ट गाइड मॅन्युअल आणि एक इजेक्शन पिन दिली आहे.
- फुल-साइज कीबोर्ड सोबत येणारा हा लॅपटॉप एस- पेनला सपोर्ट करतो.
- यात यूएसबीटाइप-सी पोर्ट्स, माइक्रोएसडी कार्ड स्लॉट, ३.५एमएम हेडफोन जॅक आणि एचडिएमआय पोर्ट आहे.
फोल्ड केल्यावर बनतो टॅब!
- ही लॅपटॉप फोल्डिंग मकॅनिजम सोबत येते.
- याला ३६० डिग्रीपर्यंत फोल्ड करून एका टॅबसारखाही वापर करता येतो.
- यात १३.३ इंचचा फुलएचडी डिस्प्ले दिला आहे, जे टच सपोर्ट करते.
- सॅमसंग नोट स्मार्टफोन सारखा यात तुम्ही एस- पेनचा सुद्धा वापर करू शकता.
- त्याला ठेवण्यासाठी वेगळा स्लॉट मिळतो. या लॅपटॉपमध्ये ११वी जेन इंटेल कोर सीपीयू, ५१२ जीबीची एसएसडी स्टोरेज आणि १६ जीबी ची रॅम मिळते.
१३एमपी कॅमेऱ्याची दमदार साथ!
- खास गोष्ट ही आहे की यात स्मार्टफोन सारखा १३ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे.
- ज्याचा वापर एचडी व्हिडीओ कॉलिंगसाठी करता येतो.
- बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनसाठी यात फिंगरप्रिंट रीडर सुद्धा आहे.