मुक्तपीठ टीम
तुम्ही जर सॅमसंग यूजर असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. सॅमसंगच्या एका ऑफरमुळे आता लवकरच सॅमसंगचे काही जुने मॉडेलही नवीनसारखेच होतील. लवकरच सॅमसंगच्या काही मॉडेलसाठी नवीन अँड्रॉइड अपडेट जारी होणार आहेत. खरं तर, सॅमसंगने गेल्या महिन्यात त्याच्या फ्लॅगशिप गॅलेक्सी एस२१ सिरीज स्मार्टफोनसाठी अॅंड्रॉईड १२ बीटा अपडेट आणला होता. आता, कंपनीकडे त्यांच्या गॅलेक्सी एस२१ सिरीजसाठी ऑपरेटिंग सिस्टमचे स्थिर अपडेट लाँन्च करण्याची क्षमता आहे. याचा अर्थ सॅमसंग गॅलेक्सी एस२१, गॅलेक्सी एस२१+ आणि गॅलेक्सी एस२१ अल्ट्रा यूजर्स लवकरच त्यांच्या स्मार्टफोनवर अॅंड्रॉईड १२ चा अनुभव घेऊ शकतील.
गॅलेक्सी एस२१ कुटुंबासाठी अॅंड्रॉईड १२ बीटाचे स्टेबल अपडेट जारी करेल. गॅलेक्सी एस21 वर पाचवा अॅंड्रॉईड १२ बीटा लाँच करण्याची कंपनीची कोणतीही योजना नाही. दुसरीकडे, कंपनी आपल्या डिव्हाइसवर अॅंड्रॉईड १२ ऑपरेटिंग सिस्टमच्या स्टेबल रोलआउटवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करेल. स्टेबल रोल आउटसह, कंपनी चौथ्या बीटामध्ये आढळलेले मागील काही बग काढून टाकेल.
हे सर्व फिचर्स नवीन अपडेटमध्ये उपलब्ध असणार…
- अँड्रॉईड १२ अपडेटसोबत सॅमसंग स्मार्टफोन्सना नवीन सॅमसंग वन यूआय ४.० अपडेट देखील मिळेल.
- वन यूआय ४.० सह, वापरकर्त्यांना चांगले स्टॉक अॅप्स, मटेरियल यू डायनॅमिक कलर थीम, लॉक स्क्रीन विजेट्स, कॅमेरा आणि मायक्रोफोन ऍक्सेस आणि नवीन विजेट बंद करण्यासाठी डेडिकेटेड क्विक सेटिंग्स टॉगल मिळणार.
- कंपनीचा दावा आहे की, नवीन अपडेटमुळे डिव्हाइसची सुरक्षा आणि प्रायव्हसी देखील वाढेल.
- वन यूआय ४.० बीटा प्रोग्राम नोव्हेंबर २०२१ च्या अखेरीस येण्याची अपेक्षा आहे.
- अपडेट प्राप्त करणारे पहिले देश अमेरिका, ब्रिटन, चीन, जर्मनी, भारत आणि दक्षिण कोरिया असतील, नंतर आणखी देश जोडले जातील.
अॅंड्रॉईड १२ कसे करायचं डाउनलोड?
- तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनच्या सेटिंग अॅपवर जावे लागेल.
- त्यानंतर सिस्टम अपडेट पर्यायावर खाली स्क्रोल करावे लागेल. आता सिस्टम अपडेट वर टॅप करा आणि तुम्हाला अपडेट मिळाले आहे का ते तपासा.
- तुम्हाला अपडेट मिळाले असल्यास, डाउनलोड करा आणि इंस्टॉल करा वर टॅप करा.
- अपडेट डाऊनलोड करण्यापूर्वी यूजर्सना त्यांच्या डेटाचा बॅकअप घेण्याचा सल्ला कंपनी देते.