मुक्तपीठ टीम
एक लॅपटॉपचा, एक स्मार्टफोनचा, एक आयपॅडचा असे एक नाही अनेक चार्जर्स. नेहमीच आपल्याला किती आणि कोणते चार्जर सोबत ठेवायचे असा प्रश्न पडतो. पण आता सॅमसंगने एक स्मार्ट चार्जर भारतात लाँच केला आहे. हा वॉल चार्जर दोन उपकरणांना जलद आणि एकाच वेळी चार्जिंग करू शकतो. हा चार्जर ब्रिक टॅब्लेट, लॅपटॉप, स्मार्टवॉच, अँड्रॉइड आणि आयफोन हे स्मार्टफोनही या चार्जरद्वारे चार्ज केले जाऊ शकतात. त्याला वायरलेस चार्जरसह देखील जोडले जाऊ शकते.
याशिवाय, चार्जर टीडब्ल्यूएस इयरबड्स आणि पॉवर बँकसह देखील वापरला जाऊ शकतो. हे यूएसबी टाईप-सी आणि यूएसबी टाईप-ए चार्जिंग पोर्टसह येते. सॅमसंगचा दावा आहे की चार्जर ५० टक्के कमी चार्जिंग वेळेत गॅलेक्सी स्मार्टफोन चार्ज करू शकतो.
सॅमसंग ३५डब्ल्यू पॉवर अडॅप्टर ड्यूओची किंमत
- सॅमसंग ३५डब्ल्यू पॉवर अडॅप्टर ड्यूओची किंमत २,२९९ रुपये आहे.
- सॅमसंग चार्जर रिटेल स्टोअर्स, Samsung.com आणि अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या प्रमुख ऑनलाइन पोर्टलवर उपलब्ध आहे.
सॅमसंग ३५डब्ल्यू पॉवर अडॅप्टर ड्यूओचे फिचर्स
- सॅमसंग ३५डब्ल्यू पॉवर अडॅप्टर ड्यूओ यूएसबी टाईप-सी पॉवर डिलिव्हरी ३.० पोर्टद्वारे ३५डब्ल्यू पर्यंत चार्जिंग आणि यूएसबी टाईप-ए पोर्टद्वारे १५डब्ल्यू पर्यंत चार्जिंग ऑफर करते.
- सॅमसंगचे म्हणणे आहे की, यूएसबी टाईप-सी द्वारे सिंगल डिव्हाइस चार्ज करताना अडॅप्टर ३५डब्ल्यू पर्यंत पॉवर पुरवतो.
- ३५डब्ल्यूची जास्तीत जास्त पॉवर आउटपुट फक्त पीसी चार्जिंगसाठी राखीव आहे.
- तसेच, सॅमसंगचे म्हणणे आहे की, गॅलेक्सी स्मार्टफोन ५० टक्के कमी वेळेत चार्ज केले जाऊ शकतात.
- कंपनी म्हणते की, सॅमसंग फास्ट चार्जिंग पद्धत गॅलेक्सी नोट डिव्हाइसेससाठी आणि गॅलेक्सी एस सिरीजसाठी सक्षम आहे.
- परंतु सॅमसंगने म्हटले आहे की, कंपनीच्या फायद्यासाठी ते इन-बॉक्स डिव्हाइस पॅकेजिंगमधून चार्जर प्लग आणि इयरफोन हळूहळू काढून टाकेल.
कुठे खरेदी करणार?
www.samsung.com/in/mobile-accessories/35w-power-adapter-duo-black-ep-ta220nbngin/