Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आर्यन खान प्रकरणाचा चुकीचा तपास भोवला, समीर वानखेडे अडगळीत!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Amir Khan Sameer Wankhede

मुक्तपीठ टीम

कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरुख याचा मुलगा आर्यन खानविरोधात तपासात कोणतेही पुरावे आढळले नसल्याने त्याला क्लिनचिट देण्यात आली आहे. मात्र या प्रकरणाचा तपास करणारे मुंबई एनसीबीचे माजी झोनल अधिकारी समीर वानखेडे अडचणीत आले आहेत. समीर वानखेडे यांच्यावर आर्यन खान प्रकरणी चुकीचा तपास केल्याचा ठपक ठेवत त्यांची चेन्नईला बदली करण्यात आली आहे. समीर वानखेडे यांना आता चेन्नईच्या DG TS म्हणजे करदाते सेवांचे महासंचालक बनवण्यात आलं आहे. समीर वानखेडे हे सध्या डीजीएमआरए पदावर कार्यरत आहेत.

समीर वानखेडेंवर कारवाई!!

  • समीर वानखेडे यांच्यावर आर्यन खान प्रकरणी चुकीचा तपास केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
  • तसेच या चुकीच्या तपासाबद्दल त्यांच्यावर केंद्र सरकारकडून कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत.
  • आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर केंद्र सरकारच्या वतीने काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
  • त्यामध्ये समीर वानखेडे यांची चेन्नईच्या डीजीटीएस पदी बदली करण्यात आली आहे.
  • हे पद अडगळीचं किंवा साईड पोस्टिंग असल्याचं समजलं जातंय.

एसआयटीकडून या प्रकरणाचा तपास…

  • महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांनी अनेक आरोप केले होते.
  • यानंतर एनसीबी मुख्यालयाने या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची स्थापना केली.
  • या तपासाची जबाबादारी एनसीबीचे उपसंचालक जनरल संजय सिंह यांना सोपवण्यात आली.
  • सूत्रांच्या माहितीनुसार, या एसआयटीने आपल्या तपासादरम्यान अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर लक्ष दिलं.
  • ज्यात अटकेच्या वेळी आर्यन खानकडून अंमली पदार्थ जप्त झाला होता का?
  • तो ड्रग्ज सिंडिकेटचा सदस्य होता का?
  • अटकेच्या वेळी त्याला एनडीपीएस कायदा लागू होता की नाही?
  • अटकेच्या वेळी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे नियम पाळले गेले होते की नाही? या मुद्द्यांचा समावेश होता.

कठोर कारवाई करण्याचे निर्देश!!

  • एनसीबीच्या एसआयटीच्या तपासात ज्या महत्त्वाच्या मुद्यांवर तपास करण्यात आला, त्यावरुन आर्यन खान दोषी आढळला नाही.
  • त्यानंतर एसआयटीने पुराव्यांअभावी आर्यन खानची निर्दोष मुक्तता केली, पण सोबतच तपास अधिकाऱ्यांवर कठोर टिप्पणीही केली.
  • या प्रकरणातील तपास अधिकाऱ्यावर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या एसआयटीने दिलेल्या अहवालाचा केंद्र सरकारने सखोल अभ्यास केल्याचे सूत्रांनी सांगितलं.
  • या प्रकरणाचे तपास अधिकारी समीर वानखेडे यांच्याकडून अनेक तांत्रिक चुका झाल्या असल्याचं या अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे.
  • त्याचबरोबर आर्यनसह सहा जणांविरुद्ध कोर्टात आरोपपत्र दाखल करता येईल, असं ठोस आणि पुरेसे पुरावे या प्रकरणात मिळालेले नाहीत.
  • एसआयटीच्या अहवालाची गांभीर्याने दखल घेत केंद्र सरकारने केंद्रीय अर्थ मंत्रालयाला याप्रकरणी कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

Tags: Aryan Khan CaseChennaiCordilia Cruze drugsDGTSSameer Wankhedeआर्यन खान प्रकरणचेन्नईसमीर वानखेडे
Previous Post

पीएम केअर फॅार चिल्ड्रेन योजनेअंतर्गत मुंबई शहर जिल्ह्यातील १९ बालकांना किटचे वाटप

Next Post

राज ठाकरेंवर बुधवारी शस्त्रक्रियेची शक्यता

Next Post
Raj Thackeray

राज ठाकरेंवर बुधवारी शस्त्रक्रियेची शक्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!