Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“बाबासाहेब पुरंदरेंनी मांडलेल्या इतिहासामुळे महाराष्ट्रात दंगली!”

संभाजी ब्रिगेडच्या मनोज आखरेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
sambhaji brigade

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि संभाजी ब्रिगेडमधील वाद वाढू लागला आहे. दरम्यान शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंनी लिहिलेल्या इतिहासामुळे महाराष्ट्रात दंगली घडल्या,असा आरोप संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे यांनी केला आहे. मनोज आखरे यांनी राज ठाकरेंनी वाटेल ते बोलून महाराष्ट्राला वेठीस धरु नये असं आवाहनही केलं आहे.

 

काय म्हणाले मनोज आखरे?

  • बाबासाहेब पुरंदरे यांच्या शंभरीत पदार्पणाचा कार्यक्रम नुकताच पार पडला.
  • यावेळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘बाबासाहेबांनी अभ्यासपूर्ण इतिहास लिहिल्याचे म्हटले होते’ त्यावर संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतला होता.
  • राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करताना आखरे यांनी कठोर शब्दात राज यांच्या भूमिकेवर टीका केली.
  • राज ठाकरे प्रबोधनकार ठाकरेंचे रक्ताचे वारसदार आहेत मात्र संभाजी ब्रिगेड ही वैचारिक वारसदार आहे, असं आखरे यांनी म्हटलं आहे.
  • राज ठाकरे ज्या लोकांचा इतिहास वाचताय त्यांच्या लिखानामुळेच महाराष्ट्रात दंगली घडल्या.

प्रबोधनकार ठाकरेंचे रक्ताचे वारस, मात्र विचारांचे नाही

  • “राज ठाकरेंनी इतिहासासंदर्भात भाष्य केलं.
  • काहीही माहिती नसताना पुरुषोत्तम खेडेकर यांच्याविषयही काहीही वक्तव्य राज ठाकरेंनी केलं आहे.
  • या महाराष्ट्रामध्ये इतिहासाचं विकृतीकरण थांबवून सामाजिक, शैक्षणिक धार्मिक द्वेषवादाचं उच्चाटन करण्याचं काम खेडेकरांच्या विचारांच्या प्रबोधनातून झालं आहे.
  • सर्व बहुजन समाजामध्ये खेडेकर आणि त्यांच्या लिखाणाबद्दल आदर आहे.
  • आपण प्रबोधनकार ठाकरेंचे रक्ताचे वारस असला तरी विचारांचे वारसदार होऊ शकला नाहीत.
  • कारण हा महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र आहे.
  • आपण प्रतिगामी व्यवस्थेचे वाहक आहात.
  • “बाबासाहेब पुरंदरे यांनी केलेलं इतिहास लेखन हे दंगलीचं स्त्रोत पसरवणारं लेखन आहे.
  • त्या माध्यमातूनच दंगली या महाराष्ट्रात झाल्या होत्या.
  • पण आपण जरी दंगली घडवत असला तरी संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवासंघाच्या विचारधारेमुळे या महाराष्ट्रातील दंगली थांबलेल्या आहेत.

 

तुम्ही हिंमत दाखवा आणि चर्चासत्र बोलवा

  • “तुमच्यात जर हिंमत असेल तर तुम्हाला जे तुमचे खरे इतिहास अभ्यासक, संशोधक वाटतात त्यांना तुम्ही बोलवा आम्ही आमचे अभ्यासक आणि संशोधक बोलवून एक चर्चा सत्र घडवू.
  • आम्ही निश्चित सांगू शकतो की तुम्हाला सत्य इतिहासाचं दर्शन घडवू शकतो.
  • तुम्हाला जे संदर्भ हवे आहेत ते सत्य आणि ऐतिहासिक संदर्भ देऊन आम्ही इतिहास मांडू.
  • तुम्ही हिंमत दाखवा आणि चर्चासत्र बोलवा. वायफळ चर्चा आणि उगाच जिभेला आलं असं बोलून उगाच महाराष्ट्राला वेठीस धरु नका.
  • महाराष्ट्र पुरोगामी असून महाराष्ट्रात फुले, शाहू, आंबेडकर यांची विचारधारा आहे.
  • तिचं जतन करण्याचं काम आजपर्यंत आम्ही केलं आहे,” असा दावाही आखरेंनी केली.

Tags: babasaheb purandaremanoj akhareRaj Thackeraysambhaji brigadeबाबासाहेब पुरंदरेमहाराष्ट्रराज ठाकरेसंभाजी ब्रिगेड
Previous Post

गॅस सिलिंडर किंमती पुन्हा २५ रुपयांनी भडकल्या! आठ महिन्यात १६५ रुपयांची वाढ!

Next Post

कुर्ल्यातील गांधी मैदान अतिक्रमणमुक्त करण्यासाठी शासनाने दर्शविली सहमती

Next Post
kurla

कुर्ल्यातील गांधी मैदान अतिक्रमणमुक्त करण्यासाठी शासनाने दर्शविली सहमती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!