Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गॅस सिलिंडर किंमती पुन्हा २५ रुपयांनी भडकल्या! आठ महिन्यात १६५ रुपयांची वाढ!

कोरोनाची जखम, त्यावर महागाईचं मीठ...सामान्य गॅसवर!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
LPG

मुक्तपीठ टीम

गेली दोन वर्षे कोरोना महामारीचा फटका अर्थव्यवस्थेला बसल्याने सामान्यांचे खिसे फाटले आहेत. कोरोनाने दिलेल्या आर्थिक जखमेवर महागाईचं मिठ चोळलं जात आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमुळे त्रस्त झालेल्या लोकांना आणखी एक धक्का बसला आहे. मंगळवारी पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमती वाढवल्या. १४.२ किलो विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरच्या किमतीत २५ रुपयांनी वाढ झाली आहे. या वाढीनंतर आता मुंबई आणि दिल्लीत १४.२ किलो एलपीजी सिलिंडरची किंमत वाढून ८५९.५० रुपये झाली आहे. यापूर्वी १ जुलै रोजी पेट्रोलियम कंपन्यांनी गॅस सिलिंडरच्या किमतीत २५ रुपयांची वाढ केली होती. या नव्या दरवाढीमुळे या वर्षी गॅस सिलिंडरच्या किंमतीत तब्बल १६५ रुपये ५० पैशांची एकूण वाढ झाली आहे.

 

देशातील सर्वात महाग गॅस यूपीत

या ताज्या वाढीनंतर देशाच्या आर्थिक राजधानीत १४.२ किलो गॅस सिलिंडरची किंमत ८५९.५० रुपयांवर गेली आहे. राजधानी दिल्लीतही तेवढीच किंमत आहे. कोलकातामध्ये ८८६ रुपये, चेन्नईमध्ये ८७५.५० रुपये, उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये सर्वाधिक ८९७.५० रुपये १४.२ किलो विनाअनुदानित सिलिंडरसाठी द्यावे लागतील. त्याचबरोबर, अहमदाबादमधील या ताज्या वाढीनंतर घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरसाठी ८६६.५० रुपये मोजावे लागतील.

 

या वर्षी गॅस सिलिंडर १६५.५० रुपयांनी महाग!

  • सहसा, पेट्रोलियम कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस सिलिंडरच्या किंमती वाढवतात.
  • पण यावेळी त्यांनी महिन्याच्या मध्यातच किमती वाढवण्याचा निर्णय घेतला.
  • या वर्षी १ जानेवारी रोजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत १५ रुपयांनी वाढ करण्यात आली होती.
  • फेब्रुवारीमध्ये पुन्हा २५ रुपयांची वाढ झाली.
  • त्यानंतर भाव वाढून ७९४ रुपये झाले.
  • मार्चमध्ये असताना, पुन्हा एकदा किमतींमध्ये वाढ झाली.
  • एप्रिलमध्ये थोडा दिलासा देत किंमत १० रुपयांनी कमी करण्यात आली.
  • यावर्षी आतापर्यंत गॅस सिलिंडरच्या किमतीत १६५.५० रुपयांची वाढ झाली आहे.

गॅस महागाई…कुठे, कधी, किती?

ऑगस्ट                         जुलै                         जून
• मुंबई               859.50                    834.50                     809
• दिल्ली             859.50                     834.50                     809
• कोलकाता       886                          861                          835
• चेन्नई              875.50                     850.50                      825


Tags: lpg cylinderprice riseएलपीजीगॅस सिलिंडर
Previous Post

“फ्लिपकार्टच्या राज्यातील प्रकल्पविस्तारामुळे रोजगार, गुंतवणूक वाढेल”: उद्योगमंत्री सुभाष देसाई

Next Post

“बाबासाहेब पुरंदरेंनी मांडलेल्या इतिहासामुळे महाराष्ट्रात दंगली!”

Next Post
sambhaji brigade

"बाबासाहेब पुरंदरेंनी मांडलेल्या इतिहासामुळे महाराष्ट्रात दंगली!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!