Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पुण्यात मराठा विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, औंधमधील डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह यावर्षी बंदच!

वसतिगृह तात्काळ सुरू करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Aundh students demand immediate start of punjabrao deshmukh hostel

मुक्तपीठ टीम

पुण्यामध्ये औंध आयटीआय येथे असलेलं डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह उद्घाटन होवूनही सध्या बंदच आहे. त्यामुळे मराठा विद्यार्थ्यांचे खूपच हाल होत आहेत. त्यामुळे ते लवकर सुरु करावं, नाही तर आंदोलनाचा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे.

 

संभाजी ब्रिगेडचे राज्य समन्वयक संतोष शिंदेंचं निवेदन

मराठा समाज लाखोंचे मोर्चे निघाल्यानंतर राज्य सरकारने विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून वस्तीगृहाची निर्मिती केली. पुण्यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख (औंध आयटीआय, पुणे) वसतीगृहाचे उद्घाटन २०१८ मध्ये तत्कालीन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले होते. मुलांसाठी २५० आणि मुलींसाठी ५० आसन क्षमता असणारे हे वसतीगृह सध्या बंद आहे.

 

वसतीगृहात प्रवेश असणारे मागील वर्षातील विद्यार्थी वारंवार जिल्हाधिकारी व सरकारकडे पाठपुरावा करत असताना सुद्धा जाणीवपूर्वक सरकारी निष्क्रियतेमुळे डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह सुरू होत नाही. कोरोना काळातील बिकट परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील ‘मुलांकडे राहिला घर नाही आणि खायला पैसे नाहीत’ अशी परिस्थिती असताना सरकार त्यांचा छळ करत आहे, हेच महाविकास आघाडी सरकारचे निष्क्रियपणाचे लक्षण आहे. विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत असून शेतकऱ्यांच्या मुलाची पुण्यात प्रचंड हेळसांड होत आहे. पुण्यातील बंद केलेली सर्व वसतीगृहांची प्रवेश प्रक्रिया सुरू करावी, अशी संभाजी ब्रिगेडची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व पुणे जिल्हाधिकारी यांना विनंती आहे. अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.

 

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह व प्रवेश प्रक्रिया तात्काळ सुरू झाले पाहिजे. अन्यथा गुरूवार दि. ३ मार्च २०२२ पासून संभाजी ब्रिगेडच्या वतीने विद्यार्थ्यांना घेऊन औंध आयटीआय समोर ‘अमरण उपोषण’ करण्यात येईल. मुळात राज्यामध्ये शाळा, महाविद्यालय सुरू झालेली असताना सुद्धा राज्य सरकार मुलांचे वस्तीगृह सुरू करू नाही, हे दुर्दैवी आहे. डॉ. पंजाबराव देशमुख वस्तीगृह, पुणे मध्ये पूर्ण वेळ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून मुलांना जेवणासाठी सुद्धा उत्तम प्रकारची मेस (खाणावळ) त्या ठिकाणी सुरू करावी. मागील काळात याच हॉस्टेल मध्ये दोन वर्ष मुलांना पिण्यासाठी पाणी नव्हते. यापेक्षा दुर्दैवी अवस्था काय…? तसेच सदर वसतिगृहासाठी पूर्णवेळ अधिकारी देण्यात यावा अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे.

 

आज गरजू मुलांनी भेट घेतली. यावेळी माझ्यासह संदिप लहाने पाटील, विद्यार्थी हर्षवर्धन शिंदे, स्वप्निल चौधरी, स्वप्निल बहीर, जयेश सोनवणे, अभिषेक शिंदे आदी उपस्थित होते.

 

सुडबुद्धीच्या राजकारणात महाराष्ट्रातील प्रमुख प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात आहे. विद्यार्थी, सुशिक्षित बेरोजगार, बे-रोजगार तरूण, नोकर भरती… इत्यादी तरुणांचे प्रमुख प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे. विद्यार्थ्यांवरील होणारा अन्याय आम्ही सहन करणार नाही, याची सरकारने नोंद घ्यावी.


Tags: punesantosh shindeऔंधडॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृहपुणेसंतोष शिंदेसंभाजी ब्रिगेड
Previous Post

नाना पटोलेंविरोधात प्रक्षोभक भाषा, माजी मंत्री अनिल बोंडेंच्या चौकशीचे आदेश

Next Post

महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकुरांना शिवसेनेचा धक्का! नगर परिषदेत जोरदार विजय, सोसायटीत सपशेल पराभव!

Next Post
Shiv Sena's strong victory in Amravati Municipal Council elections against Yashomati thakur

महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकुरांना शिवसेनेचा धक्का! नगर परिषदेत जोरदार विजय, सोसायटीत सपशेल पराभव!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!