Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

स्वच्छ व हरित ऊर्जेसाठी पेट्रोलियम कंपन्यांचेच ‘सक्षम’ जनजागृती अभियान

चित्रा नायर यांची माहिती; 'पीसीआरए', पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस मंत्रालयाचा पुढाकार

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Gas

मुक्तपीठ टीम

स्वच्छ, सुरक्षित व हरित ऊर्जा, शाश्वत विकास आणि आणि पर्यावरण संरक्षणासाठी भारत सरकारने सक्षम-२०२२ (संरक्षण क्षमता महोत्सव) हा राष्ट्रीय कार्यक्रम सुरू केला आहे. पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटना (पीसीआरए), पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने आणि तेल उद्योगातील राज्यस्तरीय समन्वयक यांनी पुढाकार घेऊन जनजागृती करण्यासंबंधित राज्य सरकारच्या सक्रिय सहभागाने आणि पाठिंब्याने हे अभियान राबवले जात आहे, अशी माहिती हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) च्या जिल्हा नोडल अधिकारी व सिनिअर एरिया सेल्स मॅनेजर चित्रा नायर यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे (एआयपीडीए) प्रवक्ते अली दारूवाला उपस्थित होते.

 

जीवाश्म इंधनावरील व्यर्थ खर्चाला आळा घालणे, परकीय तिजोरीवरील वाढते ओझे कमी करणे आणि जीवाश्म इंधनांच्या ज्वलनामुळे निर्माण झालेल्या हरितगृह वायूच्या प्रतिकूल परिणामापासून पर्यावरणाचे रक्षण करणे हे या कार्यक्रमाचे अंतिम लक्ष्य असल्याचे नायर यांनी सांगितले. पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटना (पीसीआरए) पेट्रोलियम उत्पादनांच्या संवर्धनाचे जनजागृती करण्यासाठी, इंधन-कार्यक्षम उपकरणांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि पेट्रोलियम संवर्धनाचे धोरण आणि रणनीतीचा प्रस्ताव ठेऊन, सरकारला मदत करण्यासाठी अग्रणीय आहे. तसेच, या कालावधीत संपूर्ण देशात सक्षम (संरक्षण क्षमता महोत्सव) २०२२ चे आयोजन करण्यात आले असून, संपूर्ण भारतात ‘आझादी का अमृत महोत्सव थ्रू ग्रीन अँड क्लीन एनर्जी’ असे घोषवाक्य देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

 

या अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्य सक्षम-२०२२ चे उद्घाटन नुकतेच मुंबई येथे महाराष्ट्र सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव विजय वाघमारे यांच्या हस्ते झाले. यावेळी भारत पेट्रोलियमचे कार्यकारी संचालक रवी पीएस, ऊर्जा विभागाचे उपसचिव प्रशांत बडगेरी, अर्जुन पुरस्कारप्राप्त माया मेहेर, हिंदुस्थान पेट्रोलियमचे पश्चिम क्षेत्र मुख्य महाव्यवस्थापक ध्रुव कपिल आदी उपस्थित होते.

 

या जनजागृती अभियानांतर्गत ‘रांगोळी स्पर्धा, शालेय विद्यार्थी/ शिक्षकांसाठी ‘प्रश्नमंजुषा’ स्पर्धा, शालेय विद्यार्थ्यांसाठी समूह संभाषण, वादविवाद, महाविद्यालयांमध्ये भित्तीचित्र स्पर्धा, इंधन कार्यक्षम ड्रायव्हिंग स्पर्धा, लेख लेखन, वर्तमानपत्र व टीव्ही, रेडिओवर प्रसिद्धी आणि टॉक शो अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सक्षम-२०२२ दरम्यान महाराष्ट्र राज्यात सुमारे १६ प्रकारचे ८०० उपक्रम आयोजित केले आहेत, असे नायर यांनी नमूद केले.


Tags: Chitra NairClean and green energygood newsMinistry of Petroleum and Natural GasmuktpeethPCRApetroleum companiessaksham public awareness campaignsचांगली बातमीचित्रा नायरपीसीआरएपेट्रोलियम कंपन्यापेट्रोलियम व नैसर्गिक गॅस मंत्रालयमुक्तपीठसक्षम जनजागृती अभियानसंरक्षण क्षमता महोत्सवस्वच्छ व हरित ऊर्जा
Previous Post

“खाद्यतेल तीनपेक्षा जास्त वेळा तळण्यासाठी वापरण्यास कायद्याने प्रतिबंध!”

Next Post

पुण्यात ‘वर्ल्ड ऑफ पझल्स अँड ब्रेन गेम्स ३.०’ प्रदर्शनाचे आयोजन

Next Post
Puzzles

पुण्यात ‘वर्ल्ड ऑफ पझल्स अँड ब्रेन गेम्स ३.०’ प्रदर्शनाचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!