Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज ठाकरे अयोध्या दौरा: खा. बृजभूषणनी ऐकलं नाही, आता साध्वींचं मोदींना साकडं!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Sadhavi Kanchangiri Narendra modi Raj Thackeray

मुक्तपीठ टीम

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौऱ्याला भाजपा खासदार ब्रृजभूषण शरण सिंह यांनी विरोध दर्शवला आहे. ‘आधी उत्तर भारतीयांची माफी मागा तरच अयोध्येला पाय ठेवता येईल’ अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत साध्वी कांचनगिरी यांनी बृजभूषण सिंह यांना समजवत राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांना झालेल्या मनस्तापाबद्दल आपल्याकडे खेद व्यक्त केल्याचे म्हटले होते. मात्र, बृजभूषण सिंह आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने ब्रृजभूषण सिंह यांना आवर घालण्यासाठी साध्वी कांचनगिरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. ब्रृजभूषण यांना आवरा, राज ठाकरेंना अयोध्याला येऊ द्या, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे.

पत्रकार परिषदेत काय म्हणाल्या साध्वी कांचनगिरी?

  • काही दिवसांपूर्वी बृजभूषण सिंह आणि साध्वी कांचनगिरी यांनी एक पत्रकारपरिषद घेतली होती.
  • त्यावेळी कांचनगिरी यांनी बृजभूषण सिंह यांना समजावण्याचा प्रयत्न केला होता.
  • साध्वी कांचनगिरी यांनी बोलताना राज ठाकरे यांनी आपल्याकडे उत्तर भारतीयांना झालेल्या मनस्तापाबद्दल खेद व्यक्त केला होता असा दावा केला होता.
  • मात्र, बृजभूषण सिंह आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.
  • बृजभूषण सिंह यांचे लोक मला पत्रकारपरिषदेत डोळे वटारून दाखवत होते, असे साध्वी कांचनगिरी यांनी सांगितले.

साध्वी कांचनगिरी राज ठाकरेंच्या पाठिशी ठाम उभ्या!!

  • साध्वी कांचनगिरी यांनी गेल्यावर्षी कृष्णकुंजवर येऊन राज ठाकरे यांची भेट घेतली होती.
  • त्यावेळी कांचनगिरी यांनी राज ठाकरे यांन अयोध्येला येण्याचे निमंत्रणही दिले होते.
  • आता राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा निश्चित झाल्यानंतर साध्वी कांचनगिरी त्यांच्यापाठीशी ठामपणे उभ्या आहेत.
  • राज ठाकरे हे हिंदुत्वासाठी काम करत आहेत.
  • त्यांना विरोध करणाऱ्या बृजभूषण सिंह यांचे हात रक्ताने माखलेले आहेत, अशी टीका साध्वी कांचनगिरी यांनी केली.

काय आहे नेमका वाद?

  • जून महिन्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्या दौरा करणार आहेत.
  • मात्र, “उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय राज ठाकरेंना अयोध्येत पाय ठेऊ देणार नाही,अशी भुमिका भाजपा खासदार ब्रृजभूषण शरण सिंह यांनी घेतली आहे.
  • बृजभूषण यांच्या विरोधानंतर राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे.

Tags: ayodhyaBrijBhushan Sharan SinghNarendra modiRaj ThackeraySadhvi Kanchangiriनरेंद्र मोदीबृजभूषण शरण सिंहराज ठाकरेसाध्वी कांचनगिरी
Previous Post

काश्मिरमधील फुटिरतावादी यासिन मलिक दोषी, दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचे सिद्ध!

Next Post

नवज्योत सिद्धूचं गरम डोकं…राजकारणात भोवलंच, आता तारुण्यातील चुकीसाठी वर्षभराची शिक्षा!

Next Post
Navjyot Singh Sidhu

नवज्योत सिद्धूचं गरम डोकं...राजकारणात भोवलंच, आता तारुण्यातील चुकीसाठी वर्षभराची शिक्षा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!