मुक्तपीठ टीम
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौऱ्याला भाजपा खासदार ब्रृजभूषण शरण सिंह यांनी विरोध दर्शवला आहे. ‘आधी उत्तर भारतीयांची माफी मागा तरच अयोध्येला पाय ठेवता येईल’ अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत साध्वी कांचनगिरी यांनी बृजभूषण सिंह यांना समजवत राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांना झालेल्या मनस्तापाबद्दल आपल्याकडे खेद व्यक्त केल्याचे म्हटले होते. मात्र, बृजभूषण सिंह आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने ब्रृजभूषण सिंह यांना आवर घालण्यासाठी साध्वी कांचनगिरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. ब्रृजभूषण यांना आवरा, राज ठाकरेंना अयोध्याला येऊ द्या, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे.
पत्रकार परिषदेत काय म्हणाल्या साध्वी कांचनगिरी?
- काही दिवसांपूर्वी बृजभूषण सिंह आणि साध्वी कांचनगिरी यांनी एक पत्रकारपरिषद घेतली होती.
- त्यावेळी कांचनगिरी यांनी बृजभूषण सिंह यांना समजावण्याचा प्रयत्न केला होता.
- साध्वी कांचनगिरी यांनी बोलताना राज ठाकरे यांनी आपल्याकडे उत्तर भारतीयांना झालेल्या मनस्तापाबद्दल खेद व्यक्त केला होता असा दावा केला होता.
- मात्र, बृजभूषण सिंह आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.
- बृजभूषण सिंह यांचे लोक मला पत्रकारपरिषदेत डोळे वटारून दाखवत होते, असे साध्वी कांचनगिरी यांनी सांगितले.
साध्वी कांचनगिरी राज ठाकरेंच्या पाठिशी ठाम उभ्या!!
- साध्वी कांचनगिरी यांनी गेल्यावर्षी कृष्णकुंजवर येऊन राज ठाकरे यांची भेट घेतली होती.
- त्यावेळी कांचनगिरी यांनी राज ठाकरे यांन अयोध्येला येण्याचे निमंत्रणही दिले होते.
- आता राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा निश्चित झाल्यानंतर साध्वी कांचनगिरी त्यांच्यापाठीशी ठामपणे उभ्या आहेत.
- राज ठाकरे हे हिंदुत्वासाठी काम करत आहेत.
- त्यांना विरोध करणाऱ्या बृजभूषण सिंह यांचे हात रक्ताने माखलेले आहेत, अशी टीका साध्वी कांचनगिरी यांनी केली.
काय आहे नेमका वाद?
- जून महिन्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्या दौरा करणार आहेत.
- मात्र, “उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय राज ठाकरेंना अयोध्येत पाय ठेऊ देणार नाही,अशी भुमिका भाजपा खासदार ब्रृजभूषण शरण सिंह यांनी घेतली आहे.
- बृजभूषण यांच्या विरोधानंतर राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे.