मुक्तपीठ टीम
एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करणं शक्य नाही, असं त्रिसदस्यीय समिती हा अहवाल शुक्रवारी परिवहन मंत्री अनिल परब यांनी विधानसभेत पटलावर ठेवला. याच पार्श्वभूमीवर सुरुवातीला एसटी कर्मचारी संपात सहभागी झालेल्या आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
सरकार जेवायला बोलावतं आणि ताटात काहीच नसतं- खोत
- आमदार सदाभाऊ खोत म्हणाले की, ‘सरकार जेवायला बोलावतं आणि ताटात काहीच नसतं’, अशी सरकारची अवस्था आहे.
सकाळपासून अनेक एसटी कामगार आमच्याकडे आले. - आमची चर्चा सुरु आहे.
- आम्ही एसटी कामगारांसोबत आहोत.
- सरकार तुमचं ऐकणार नाही तर आम्ही तुमच्यासोबत आहोत. सरकार कामगारांना फक्त तारीख पे तारीख देत आहे.
- आमच्या अपेक्षा आहे की कामगारांसोबत सरकारनं चर्चा करावी, जी अद्याप केलेली नाही.
- राज्य सरकारला थोडं पलिकडे जाऊन पाहण्याची गरज आहे.
आम्ही कर्मचाऱ्यांच्या सोबत – पडळकर
- एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करु नयेत.
- आत्महत्या करुन मार्ग निघत नाही.
- कामावर हजर झाल्यानंतरही काही कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली.
- सरकार कर्मचाराऱ्यांना कामावर हजर व्हा असं सांगतंय आणि दुसरीकडे त्यांच्यावर कारवाई होतेय.
- आम्ही कर्मचाऱ्यांच्या सोबत आहोत.
- ज्या दिवशी आम्ही सरकारशी चर्चा केली त्या दिवशी आम्ही बाहेर पडलो.
- सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन का संपवलं नाही?