मुक्तपीठ टीम
फक्त क्रिकेट प्रेमींनाच नाही तर कुणालाही आवडेल अशी ही चांगली बातमी आहे. भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा २१ व्या शतकाचा महान फलंदाज आहे यात कोणत्याही क्रिकेटप्रेमींच्या मनात कसलीही शंका असू शकत नाही. पण आता त्यावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले आहे.
क्रिकेटच्या विश्वातला महान खेळाडू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याची निवड २१ व्या शतकाचा महान फलंदाज म्हणून झाली आहे. सचिनला प्रतिस्पर्धी म्हणून श्रीलंकेचा महान फलंदाज कुमार संगकाराची टक्कर मिळाली. दोन्ही खेळाडूंचे समान गुण होते, परंतु अधिक ज्युरी सदस्यांचा कौल मिळाल्यामुळे सचिन हा विजेता ठरला. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात एजिस बॉल येथे आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या दुसर्या दिवशी ही घोषणा करण्यात आली.
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) च्या अंतिम सामन्यापूर्वी कसोटी सामन्यात ऐतिहासिक क्षण साजरा करण्यासाठी कसोटी क्रिकेटमधील आतापर्यंतचा २१ व्या शतकाचा महान खेळाडू निवडण्याची योजना आखली होती.
स्टार स्पोर्ट्सने बॅट्समन, गोलंदाज, अष्टपैलू आणि कर्णधार यातील एक महान खेळाडू निवडण्याची योजना आखली. त्यानुसार क्रिकेट तज्ज्ञ एकत्र आणले.
कोणते गट, कोणते क्रिकेटर्स?
- त्यासाठी फलंदाज गटात सचिन तेंडुलकर, स्टीव्हन स्मिथ, कुमार संगकारा, जॅक कॅलिस
- गोलंदाज गटात मुथय्या मुरलीधरन, शेन वॉर्न, डेल स्टेन, ग्लेन मॅकग्रा
- अष्टपैलू गटात जॅक कॅलिस, बेन स्टोक्स, अँड्र्यू फ्लिंटॉफ, रविचंद्रन अश्विन
- कर्णधार गटात स्टीव्ह वॉ, ग्रॅमी स्मिथ, रिकी पॉन्टिंग आणि विराट कोहली
कशी झाली महान क्रिकेटर्सची निवड?
- स्टार स्पोर्ट्सने महान खेळाडूंना निवडण्यासाठी ५० सदस्यीय ज्युरीची स्थापना केली होती.
- ज्यात दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर, इयान बिशप, हरभजन सिंह, शेन वॉटसन, स्कॉट स्टायरिस, गौतम गंभीर, ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आणि कोचचा समावेश होता.
- स्चारने चाहत्यांनाही ज्यूरीचा भाग होण्याची संधी दिली आहे.
- क्रिकेट प्रेमींनी ट्विटरवर १५ जून रोजी आपला आवडता कर्णधार आणि अष्टपैलू निवडण्यासाठी मतदान केले.
- तर फलंदाज आणि गोलंदाज निवडण्यासाठी १७ जूनला मतदान केले.
- महान खेळाडू निवडण्याच्या प्रक्रियेबद्दल बोलताना, त्यात संपूर्ण पारदर्शकता सुनिश्चित केली गेली आहे.