Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“ब्रुक फार्मा कंपनी व इंजेक्शनचोर भाजपा नेत्यावर गुन्हा दाखल करा!”: सचिन सावंत

April 20, 2021
in घडलं-बिघडलं
0
sachin sawant

मुक्तपीठ टीम

 

रेमडेसीवीर इंजेक्शनसाठी रुग्णांचे नातेवाईक पायपीय करत आहेत. राज्य सरकारलाही या इंजेक्शनचा पुरेसा पुरवठा होत नसताना ८ एप्रिल व १२ एप्रिल रोजी भाजपाचे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी अंमळनेर व नंदुरबारला हजारो रेमडेसीवीर इंजेक्शन वाटले. हा साठा पूर्णपणे निर्यातीसाठी होता. राज्याची बंदी असताना त्यांनी ही औषधे खाजगीरित्या कशी वाटली? भाजपा नेत्यांचे व ब्रूक फार्मा कंपनीचे रेमडेसीवीरच्या काळाबाजारात संगनमत होते हे उघड आहे. त्यामुळे ब्रुक फार्मा कंपनी व इंजेक्शनचोर भाजपा नेत्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

 

यासंदर्भात बोलताना सावंत पुढे म्हणाले की, दमण प्रशासनाने ब्रूक फार्मा कंपनीला महाराष्ट्रात त्यांचे रेमडेसीवीर वितरण करण्यास परवानगी दिली नाही असे कंपनीच म्हणते तर मग महाराष्ट्रात हा साठा आला कसा? विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रविण दरेकर यांना मार्ग दाखविणारे‌ शिरीष चौधरी हे प्रविण दरेकर व प्रसाद लाड यांच्याबरोबर दमणला गेले होते. त्यामुळे हे प्रकरण अधिकच गंभीर होते. सदर रेमडेसीवीर इंजेक्शन निर्यातीकरता होते तसेच त्याची वितरणाकरता एफडीएची परवानगी नव्हती आणि रेमडेसीवीरसारखे नोंदणीकृत औषध असे विकले जाणे व लोकांकडून अनधिकृतपणे पैसे घेणे हे भयानक आहे. मुंबईतील रेमडेसीवीरच्या अवैध साठ्याप्रकरणी डीसीपी मंजूनाथ सिंगे यांनी योग्य कारवाई केली होती आणि दोन्ही विरोधी पक्ष नेते फडणवीस व दरेकर यांनी केलेली नौटकी उघड झाली आहे, असे म्हणत लवकरच यासंदर्भात अधिकृत तक्रार दाखल करु असेही सावंत म्हणाले.

 

 


Tags: BJPCongressdevendra fadanvissachin swantरेमडेसीवीर इंजेक्शनशिरीष चौधरी
Previous Post

अजय देवगण मोबाइल पडद्यावर…’रुद्र’ वेबसिरीजच्या माध्यमातून पदार्पण

Next Post

राज्यातील ७ लाख १५ हजार रिक्षा परवानाधारकांना सानुग्रह अनुदान

Next Post
auto

राज्यातील ७ लाख १५ हजार रिक्षा परवानाधारकांना सानुग्रह अनुदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!