मुक्तपीठ टीम
युद्धाच्या पाचव्या दिवशीही रशिया आणि युक्रेनचा युद्धाचा वणवा हा पेटलाच आहे. मात्र एकेकाळी सोव्हिएत युनियनच्या काळात मित्र असलेले हे प्रांत दोन देश झाल्यानंतर एकमेकांचे शत्रू का झाले आहेत? हे आज आपण जाणून घेणार आहोत.
रशिया – युक्रेन संघर्षाचा इतिहास
- सध्याचा रशिया हा युरोपपासून आशियातही पसरलेला आहे.
- मात्र पूर्वी सोव्हिएट रशिया म्हणून अस्तित्वात असलेल्या देशाचा विस्तार त्यापेक्षाही मोठा होता.
- १९९१ पर्यंत युक्रेनही सोव्हिएत युनियनचा भाग होता.
- त्यानंतर काही प्रांत सोव्हिएट रशियातून फुटून निघाले.त्यातील एक युक्रेन.
- तेव्हापासून क्रिमिया या भागावरून दोन देशांमध्ये संघर्ष सुरुच आहे.
- युक्रेनच्या पश्चिमेला युरोप आणि पूर्वेला रशियाची सीमा आहे.
- नोव्हेंबर २०१३ मध्ये युक्रेनचे तत्कालीन अध्यक्ष व्हिक्टर यानुकोविच यांनी कीवमध्ये विरोध करण्यास सुरुवात केली तेव्हा रशिया आणि युक्रेन यांच्यातील तणाव सुरू झाला.
- अमेरिकेच्या चिथावणीने व्हिक्टर यांच्याविरोधात आंदोलन पेटले. अमेरिका – ब्रिटनचा व्हिक्टर यांना विरोध होता, तर त्यांना रशियाचा पाठिंबा होता.
- व्हिक्टर यानुकोविच यांना फेब्रुवारी २०१४ मध्ये अमेरिका-ब्रिटेन समर्थित आंदोलकांच्या विरोधामुळे देश सोडून पळून जावे लागले.
- त्यामुळे संतप्त होऊन रशियाने दक्षिण युक्रेनमधील क्रिमियावर कब्जा मिळविला.
- यानंतर त्यांनी तेथील फुटीरतावाद्यांना पाठिंबा दिला.
- या फुटीरतावाद्यांनी पूर्व युक्रेनचा मोठा भाग ताब्यात घेतला.
- २०१४ पासून, डोनबास प्रांतात रशियन समर्थक फुटीरतावादी आणि युक्रेनियन सैन्यांमध्ये लढाई सुरू आहे.
याआधीही तणाव निवळण्यासाठी झाले प्रयत्न!
- याआधीही १९९१ मध्ये जेव्हा युक्रेन सोव्हिएत युनियनपासून वेगळा झाला होता, तेव्हा क्रिमियावरून दोन्ही देशांमध्ये अनेक संघर्ष झाले होते.
- २०१४ नंतर रशिया आणि युक्रेनमध्ये सततचा तणाव आणि संघर्ष रोखण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी पाश्चात्य देशांनी पुढाकार घेतला.
- फ्रान्स आणि जर्मनी यांनी २०१५ मध्ये बेलारूसची राजधानी मिन्स्क येथे शांतता आणि युद्धविराम करारावर स्वाक्षरी केली.
रशियाला नाटोचे का वावडे?
- मुळातच नाटोची निर्मिती शीतयुद्धाच्या काळात रशियाविरोधात झाली.
- अमेरिकेने तत्कालीन सोव्हिएत युनियनशी सामना करण्यासाठी नाटो म्हणजेच ‘North Atlantic Treaty Organisation’ ची निर्मिती १९४९ मध्ये झाली.
- अमेरिका आणि ब्रिटनसह जगातील ३० देश नाटोचे सदस्य आहेत. जर एखाद्या देशाने तिसऱ्या देशावर हल्ला केला तर नाटोचे सर्व सदस्य देश एकत्र येऊन त्याचा मुकाबला करतात.
- नाटोने आपला विस्तार करू नये, अशी रशियाची इच्छा आहे.
- अलीकडेच युक्रेनने नाटोशी जवळीक आणि मैत्री निर्माण करण्यास सुरुवात केली.
- अमेरिकेमुळे युक्रेनचे नाटोशी चांगले संबंध आहेत.
- युक्रेनची नाटोशी जवळीक रशियाला आवडली नाही.
- या मागणीबाबत राष्ट्राध्यक्ष पुतिन युक्रेन आणि पाश्चात्य देशांवर दबाव आणत होते.