Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

विद्यार्थ्यांचा विश्वविक्रम…एनडी स्टुडिओत छत्रपती शिवाजी महाराजांची रुबिक्स क्युब्स प्रतिमा!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Rubik's Cube image

मुक्तपीठ टीम

‘महाराष्ट्र दिना’निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी एक भन्नाट उपक्रम झाला. पाच हजारांपेक्षा जास्त रुबिक्स क्युब्स वापरून शिवछत्रपतींची भव्य प्रतिमा साकारली गेली. हा विश्व विक्रम आहे. कर्जतच्या एनडी स्टुडिओमध्ये नुकताच ‘महा उत्सव’ साजरा झाला. त्यात मुंबई, रायगड , पुणे व नवी मुंबई येथील ५०२३ शालेय विद्यार्थी आणि कलाकारांनी भाग घेतला. त्यांनी १३ बाय १२ फुटाची शिवरायांची प्रतिमा तीन तासांमध्ये साकारली. ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ प्रतिनिधींच्या उपस्थितीत ही प्रतिमा बनवण्यात आली. ‘एन डी आर्ट वर्ल्ड’ आणि सहआयोजक ‘व्हर्सैटाईल एज्युकेशन सिस्टीम’ यांच्या पुढाकाराने हा विश्व विक्रम करण्यात आला.

महाराष्ट्राच्या महान परंपरेचा वारसा जपणाऱ्या ‘महा उत्सव’ची १ मे रोजी सांगता झाली. महामेळा, महाकला, महाखेळ, महासंस्कृती, महास्वाद, महाव्यवसाय आणि महागौरव असे महाराष्ट्राच्या महान परंपरेचे सप्तरंगी इंद्रधनुष्य महाराष्ट्रात अवतरले. श्रेयसी वझे आणि मंदार आपटे यांच्या संकल्पनांतर्गत बनलेले ‘महाराष्ट्र गीत’ यावेळी सादर करण्यात आले. तर गायक नंदेश उमप यांचा ‘मी मराठी’ हा सुरेल कार्यक्रम आणि मराठ्यांची गौरव गाथा मांडणाऱ्या ‘महा नाट्य’ यांनी रसिकांची मने जिंकली. या महोत्सवाला देशातील वेगवान कृषी आणि मत्स्यपालन कंपनी ‘ए एस अ‍ॅग्री’ आणि ‘अ‍ॅक्वा एलएलपी’ यांचे सहकार्य लाभले आहे. व्हर्टिकल फार्मिंग क्लस्टर प्रकल्पाद्वारे हळदीच्या क्रांतिकारक उत्पादनाबाबत जागरूकता करणारा प्रकल्प यावेळी सादर करण्यात आला.

“नितीन चंद्रकांत देसाई यांच्याद्वारे आयोजित हा महा उत्सव कलाकारांचा व कलेचा महाकुंभ आहे. या महाउत्सवमध्ये कित्येक कलाकारांना व्यासपीठ मिळाले, रोजगार मिळाला. विशेष म्हणजे सर्वांना या ठिकाणी प्रवेश विनामूल्य देऊन या उत्सवाचा लाभ घेता आला. त्याबद्दल नितीन देसाई यांचे मी कौतुक करतो व त्यांना शुभेच्छा देतो.” असे मत केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केले
”पँडेमिकनंतर हजारो कलाकारांना प्रोत्साहन देत त्यांना कला सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळावं, रोजगार उपलब्ध व्हावे या उद्देशाने महा उत्सवाचं आयोजन करण्यात आलं. अनेक कलाकारांची स्वप्न साकार होत असल्याने या उत्सवाचा उद्देश साध्य होत असल्याचं पाहून समाधान वाटतं.” अशा भावना ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी व्यक्त केल्या. ‘महाकला’ उपक्रमाद्वारे राज्यातल्या विविध लोककलांचे मनोहारी दर्शन घडले. कलाकार सचिन जुवाटकर यांनी उद्योगपती रतन टाटा यांचं साकारलेलं चित्र चर्चेचा विषय ठरलं. मोती, तुळस, रक्तचंदन आदी गोष्टींचा वापर करत हे चित्र त्यांनी बनवलं. हे चित्र पाहताच सचिन यांना टाटा फाऊंडेशकडून फोन आला असून लवकरच ते रतन टाटा यांच्यासोबत प्रत्यक्ष भेट घेणार आहेत.

 

पाहा व्हिडीओ:

 


Tags: Chhatrapati Shivaji MaharajChhatrapati Shivaji Maharaj Rubik's Cube imagegood newsmuktpeethND Art WorldND Studioएन डी आर्ट वर्ल्डएनडी स्टुडिओचांगली बातमीछत्रपती शिवाजी महाराजछत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयमुक्तपीठ
Previous Post

बॉलिवूडच्या हिरोंपेक्षा साऊथचे नायक भारी! केजीएफच्या यशनेही नाकारली पानमसाला जाहिरात!!

Next Post

चारधाम यात्रेचा शुभारंभ! यात्रेकरुंची पहिली तुकडी रवाना, पालखीचं प्रस्थान!

Next Post
uttarakhand

चारधाम यात्रेचा शुभारंभ! यात्रेकरुंची पहिली तुकडी रवाना, पालखीचं प्रस्थान!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!