Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बॉलिवूडच्या हिरोंपेक्षा साऊथचे नायक भारी! केजीएफच्या यशनेही नाकारली पानमसाला जाहिरात!!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, मस्तच
0
kgf hero yash

मुक्तपीठ टीम

असली हिरो कोण? अशा प्रश्नावर जर कुणी सोशल मीडिया पोल घेतला तर? खात्रीनं रसिकांचा कल दाक्षिणात्य हिरोंकडेच जाण्याची शक्यताय. बॉलिवुडमधील अक्षयकुमार, अजय देवगन, शाहरुख खान यांसारखे सुपरस्टार्सनी पैशासाठी पान मसाल्याच्या जाहिरातीही केल्या. पण पुष्पाच्या अल्लू अर्जुननंतर आता केजीएफच्या यशनेही अशा जाहिरातींना नकार दिलाय.

बॉलिवूडचे अक्षयकुमार, अजय देवगन, शाहरुख खान यांसारखे सुपरस्टार जेव्हा पैशांसाठी पान मसाल्याच्या जाहिराती करत असल्याने ट्रोल होत आहेत. त्याचवेळी दक्षिणेतील काही अभिनेते मात्र पैशापेक्षा आपल्या चाहत्यांच्या हिताला महत्व देत वेगळी भूमिका घेत आहेत. जे अक्षय, अजय, शाहरुखला जमलं नाही ते आधी अल्लू अर्जुनने केले. पुष्पा चित्रपटाचा नायक अल्लू अर्जूनने एका पान मसाला जाहिरातीच्या मोठ्या ऑफरला नकार दिला. आता केजीएफचा हिरो यशनेही तेच केलं आहे. पान मसाला ब्रँडने एका जाहिरातीसाठी या साउथ सुपरस्टारशी संपर्क साधला आहे. पण लोकांच्या भावना आणि आरोग्य लक्षात घेऊन या अभिनेत्याने जाहिरातीची ऑफर नाकारली आहे.

‘केजीएफ चॅप्टर २’ दणक्यात चालत असल्याने यश सध्या चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाच्या यशाचे विक्रम प्रस्थापित करत असलेल्या यशने पान मसाला ब्रँडच्या जाहिरातीस नकार दिला आहे.

याबद्दल माहिती देताना यशच्या जाहिरातीचे व्यवस्थापन करणाऱ्या एजन्सीने सांगितले की, “पान मसाला आणि अशा उत्पादनांचा लोकांच्या आरोग्यावर अत्यंत घातक परिणाम होतो. त्यांचा वापर त्यांच्या जीवनासाठी धोकादायक ठरू शकतो. यशने त्याच्या चाहत्यांची आणि फॉलोअर्सची काळजी घेतली आहे. लोकांच्या हितासाठी यशने वैयक्तिकरीत्या खूप फायदेशीर असलेला करार नाकारला आहे.”

अक्षय कुमार ट्रोलर्सच्या निशाण्यावर

  • अक्षय कुमारने पान मसाला या ब्रँडपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतल्यानंतर ही बातमी समोर आली आहे.
  • अक्षय कुमारने अलीकडेच अजय देवगण आणि शाहरुख खानसोबत विमलच्या इलायची उत्पादनांची जाहिरात केली.
  • यानंतर त्याला सोशल मीडियावर चाहत्यांच्या नाराजीला सामोरे जावे लागले.
  • सततच्या ट्रोलिंगमुळे, अक्षय कुमारने ब्रँडचा प्रचार न करण्याचा निर्णय घेतला आणि भविष्यात हुशारीने जाहिरात निवडण्याचे वचन दिले.

 

पाहा व्हिडीओ:

 


Tags: bollywood actorscelebritiesGoodNewskgf hero yashmuktpeethpaan masala advertisementstollywoodकेजीएफ हिरो यशचांगली बातमीटॉलीवूडपान मसाला जाहिरातबॉलीवूड कलाकारमुक्तपीठसेलिब्रिटी
Previous Post

राज्यात ९२ नवे रुग्ण, ७० बरे! मुंबई ५६, पुणे २०, ठाणे ६

Next Post

विद्यार्थ्यांचा विश्वविक्रम…एनडी स्टुडिओत छत्रपती शिवाजी महाराजांची रुबिक्स क्युब्स प्रतिमा!

Next Post
Rubik's Cube image

विद्यार्थ्यांचा विश्वविक्रम...एनडी स्टुडिओत छत्रपती शिवाजी महाराजांची रुबिक्स क्युब्स प्रतिमा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!