Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

संघाची मोदी सरकारकडे मागणी, युद्ध रोखण्यासाठी रशियावर दबाव आणा! भारताचं मात्र रशियाविरोधात मतदान नाही!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
ukraine

मुक्तपीठ टीम

शनिवारी सलग तिसऱ्या दिवशीही युक्रेनची राजधानी किव्हवर रशियन सैन्याचे हल्ले सुरुच आहेत. या युद्धात शेकडो लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्याचबरोबर सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) केंद्र सरकारला युक्रेनमध्ये लष्करी आक्रमण थांबवण्यासाठी रशियावर दबाव आणण्यास सांगितले आहे. संघाने जागतिक नेते, मुत्सद्दी आणि समाजातील इतरांना पुतीन यांना संवादाद्वारे समस्येचे निराकरण करण्यासाठी राजी करण्याचे आवाहन केले.

 

शुक्रवारी, संघाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य इंद्रेश कुमार यांनी देखील रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर युक्रेनवरील लष्करी आक्रमण त्वरित थांबवण्यासाठी दबाव आणण्यासाठी इतर देशांशी हातमिळवणी करण्याचे आवाहन केले. संघाच्या एका वरिष्ठ प्रचारकाने एका संदेशात म्हटले आहे की, युद्धाने कोणतीही समस्या सुटत नाही. यामुळे मानवतेचे नुकसान होते. भारताला शांतता हवी आहे. युद्धाला जन्म देणारी कोणतीही परिस्थिती असू नये. युद्धाची भीषणता अत्यंत भयावह, वेदनादायक आणि असह्य असते.

 

राष्ट्रीय ख्रिश्चन मंच आणि राष्ट्रीय मुस्लिम मंचचे संस्थापक इंद्रेश कुमार यांनीही मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाच्या नेत्यांना रशियाने शांतता, सौहार्द आणि बंधुतेचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले. युद्ध हा कोणत्याही समस्येवरचा उपाय नाही. यामध्ये हजारो निष्पाप लोक मारले गेले आणि लाखो लोक बेघर झाले. करोडोंचे आर्थिक नुकसान झाले आहे. गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाच्या राष्ट्राध्यक्षांशी युक्रेनच्या मुद्द्यावर चर्चा केल्यानंतर रशिया आणि नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (नाटो) गट यांच्यातील मतभेद प्रामाणिक आणि गंभीर संवादातून सोडवण्यावर भर दिला होता.

 

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या मदतीसाठी हिंदू स्वयंसेवक संघ पुढे

  • युक्रेनमध्ये स्थायिक झालेल्या अनिवासी भारतीयांच्या मदतीसाठी संघाशी संलग्न हिंदू स्वयंसेवक संघ (एचएसएस) पुढे आला आहे.
  • संकटात सापडलेल्या भारतीयांच्या मदतीसाठी संपर्क मोहीम सुरू करण्यात आली आहे.
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मेरठ प्रांत आणि त्याच्याशी संलग्न संघटना ही माहिती त्यांच्या संपर्कांसह सामायिक करत आहेत, जेणेकरून जास्तीत जास्त भारतीयांना मदत करता येईल.
  • युक्रेनमध्ये राहणाऱ्या अनिवासी भारतीयांना मदत करण्यासाठी हिंदू स्वयंसेवक संघाने गुगल फॉर्म जारी केला आहे, जेणेकरून त्यांची माहिती संकलित करून संपर्क साधता येईल.

Tags: Hindu Swayam Sevak SangrssRussiaUkraineइंद्रेश कुमारराष्ट्रीय स्वयंसेवक संघहिंदू स्वयंसेवक संघ
Previous Post

रशियाचा मुकाबला करण्यासाठी युक्रेनचं नवं तंत्र! सायबर वॉर कसं चालतं?

Next Post

Tata Motors celebrates India’s #1 SUV brand

Next Post
Tata Motors celebrates India’s #1 SUV brand

Tata Motors celebrates India’s #1 SUV brand

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!