मुक्तपीठ टीम
राष्ट्रीय जनता दलचे अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची प्रकृती सुधारावी म्हणून त्यांची लेक रोहिणी आचार्यने मोठा निर्णय घेतला आहे. रोहिणीने आपल्या वडिलांना किडनी देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसांत लालू प्रसाद यादव किडनी प्रत्यारोपनसाठी सिंगापूरला रवाना होणार आहेत. रोहिणी आचार्य या लालू आणि राबडीदेवी यांची दुसऱ्यानंबरची कन्या आहे.
वडिलांच्या प्रकृतीसाठी लालू प्रसाद यांच्या मुलीचे मोठं पाऊल!!
- २४ नोव्हेंबरला लालू यादव किडनी प्रत्यारोपणासाठी सिंगापूरला जाणार आहेत.
- तसेच, लालू यादव यांना किडनी दान करण्यासाठी स्पर्धा होती.
- दोन डझन कार्यकर्ते आणि नेत्यांसह त्यांच्या कुटुंबातील सदस्यही त्यांना किडनी दान करण्यास इच्छुक होते.
- विशेष म्हणजे लालू यादव सध्या दीड डझन आजारांशी लढा देत आहेत.
- अशा स्थितीत किडनी प्रत्यारोपणाचे ऑपरेशन सोपे नसणार.
लालू यादव याना मुलीची किडनी घ्यायची नव्हती…
- लालू यादव यांना किडनी दान करण्यासाठी अनेक लोकांचे नमुने घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
- यामध्ये काही जणांची किडनी दानासाठी निवड करण्यात आली.
- यापैकी एक नाव रोहिणी आचार्य यांचेही होते.
- सुरुवातीला लेकीची किडनी घेण्यास लालू प्रसाद यादव यांनी नकार दिला होता.
- पण अखेर त्यांच्या मुलीने किडनी प्रत्यारोपणासाठी वडिलांना तयार केलं.
- कुटुंबातील सदस्य किडनी दान करत असेल तर, ती शस्त्रक्रिया अधिक यशस्वी होते.
- किडनीच्या आजारांसाठी प्रसिद्ध असलेल्या सिंगापूरमधील सेंटर फॉर किडनी डिसीजमध्ये लालू यादव यांच्यावर उपचार सुरू आहेत.
- मात्र, दिल्ली एम्सच्या डॉक्टरांनी ऑपरेशन करण्यास नकार दिला.
- मात्र सिंगापूरच्या डॉक्टरांना तपासात सर्वकाही बरोबर आढळले.