मुक्तपीठ टीम
केरळच्या रिझवानाने चहाच्या पानांची पाऊडर वापरुन ५ तास ३० मिनिटांत देशाच्या माजी पंतप्रधानांचे पोट्रेट बनविले आहेत. या कामामुळे तिचे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदले गेले आहे. रिझवानाला लहानपणापासूनच चित्रकला आवडत होती. बर्याच प्रयोगानंतर तिने चहाच्या पानांच्या पाऊडरने ही कला साकारण्यासाठी वापरली. हे पोर्ट्रेट तयार करण्यासाठी तिने ए-3 आकाराच्या कागदाचा वापर केला.
रिझवानाने काढलेले टी पोर्टेट
१. जवाहरलाल नेहरू
२. लाल बहादुर शास्त्री
३. इंदिरा गांधी
४. मोरारजी देसाई
५. चौधरी चरण सिंह
६. राजीव गांधी
७. व्हीपी सिंह
८. चंद्रशेखर
९. पीव्ही नरसिंहराव
१०. एचडी देव गौड
११. गुलझारी लाल नंदा
रिझवानाची मोदींच्या टी पोट्रेटची इच्छा
• तिला भविष्यातही चहाच्या पानांच्या पावडरसह असेच कलात्मक कार्य करणे सुरू ठेवायचे आहे.
• रिझवानाला ही पावडर वापरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पोर्ट्रेट काढून त्यांना गिफ्ट करायचे आहे.
• ती चार्टर्ड अकाउंटन्सीची विद्यार्थिनी आहे.
• तिच्या वडिलांचे नाव अब्दुल लतीफ आणि आईचे नाव सौमाया आहे.
• रिझवानाचे कुटुंब तिला या कामात मदत करते.