Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता लहान बाळांसाठी खादी सुती कपडे, ‘यूज अँड थ्रो’ कागदी चप्पल!

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते खादी ग्रामोद्योगच्या नवीन उत्पादनांचा शुभारंभ

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
khadi

मुक्तपीठ टीम

खादी व ग्रामोद्योग मंडळ आता कात टाकत आहे. आतापर्यंत ठराविक उत्पादनांच्या चाकोरीतच अडकलेलं हे मंडळ आता चाकोरीबाहेरचे प्रयोग करत आहे. आता लहान बाळांसाठी खादी सुती कपडे, ‘यूज अँड थ्रो’ कागदी चप्पल बनवण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

narayan rane

केंद्रीय एमएसएमई मंत्री नारायण राणे यांनी या खादीच्या दोन नवीन वेगळ्या उत्पादनांचा शुभारंभ केला. नवी दिल्ली येथील कॅनॉट प्लेसमधील खादी इंडियाच्या दालनामध्ये हा शुभारंभ झाला.

 

लहान बाळांसाठी प्रथमच खादीचे सुती कपडे

• नवीन उत्पादनांमध्ये मुलांसाठी प्रथमच खादीच्या सुती कपड्यांचा समावेश आहे.
• सुरवातीस, केव्हीआयसीने नवजात शिशूंपासून दोन वर्षापर्यंतच्या लहान बाळांसाठी बिनबाह्यांचे कपडे (झबली) आणि ब्लूमर आणि नॅपीजसह फ्रॉक्स ची निर्मिती केली.
• केव्हीआयसीने १००% हातमाग आणि हाताने विणलेल्या सूती कपड्यांचा वापर केला आहे.
• तो कपडा मुलांच्या कोमल आणि संवेदनशील त्वचेवर मऊसूत असल्याने इजा करत नाही. त्यांना कोणत्याही पुरळ किंवा त्वचेवर जळजळ होण्यापासून प्रतिबंधित करतो.

khadi

प्रथमच खादीच्या ‘यूज अँड थ्रो’ हस्तनिर्मित कागदी चप्पल

• भारतात प्रथमच विकसित केल्या गेलेल्या खादीच्या “यूज अँड थ्रो” हस्तनिर्मित कागदी चप्पलही बनवण्यात आल्या आहेत.
• या हस्तनिर्मित कागदी चप्पल १००% पर्यावरणपूरक आणि किफायतशीर आहेत.
• या चप्पल बनवण्यासाठी वापरलेला हस्तनिर्मित कागद पूर्णपणे लाकूड-मुक्त असून कापूस आणि रेशीम चिंध्या आणि तणांसारख्या नैसर्गिक धाग्यांनी बनलेला आहे.
• या चपला वजनाने हलक्या असून घर, हॉटेल खोल्या, रुग्णालये, प्रार्थनास्थळे, प्रयोगशाळा इत्यादी घरगुती वापरासाठी व प्रवासासाठी योग्य आहेत.
• स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून देखील त्या प्रभावी आहेत.

khadi

खादीची उत्पादने दर्जेदार पण पण परवडणारी!

• लहान मुलांसाठीच्या खादी सुती कपड्यांची किंमत सर्वत्र प्रति कपडा ५९९ रुपये आहे.
हाताने बनवलेल्या कागदाच्या चप्पलच्या प्रत्येक जोडीची किंमत फक्त ५० रुपये आहे.
• ही दोन नवीन उत्पादने कॅनॉट प्लेसमधील खादी दालनात तसेच केव्हीआयसीच्या ऑनलाइन पोर्टल www.khadiindia.gov.in वर खरेदी करता येतील.

khadi

नवीन खादी उत्पादनांचे उद्‌घाटन करताना राणे यांनी पर्यावरणपूरक आणि टिकाऊ उत्पादनांच्या मोठ्या प्रमाणावरील विपणनावर भर दिला. त्यांनी सांगितले की या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बाजारपेठ मिळवून केव्हीआयसी अधिकाधिक रोजगाराच्या संधी निर्माण करू शकेल आणि ग्राहकांची संख्या मोठ्या फरकाने वाढवू शकेल.

khadi

केव्हीआयसीचे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना म्हणाले की, हस्तनिर्मित पेपर उद्योगाला आधार मिळावा आणि कारागिरांना शाश्वत रोजगार मिळावा या उद्देशाने केव्हीआयसीने हस्तनिर्मित कागद “यूज अँड थ्रो” चप्पल विकसित केली आहेत. ते म्हणाले की, केव्हीआयसी पहिल्यांदाच लहान बाळांच्या कपड्यांच्या उत्पादनात उतरली आहे. यावेळी एमएसएमई राज्यमंत्री भानु प्रतापसिंगही उपस्थित होते.


Tags: khadi indiaNarayan raneखादी व ग्रामोद्योग मंडळनारायण राणेभानु प्रतापसिंगयूज अँड थ्रोविनय कुमार सक्सेना
Previous Post

रिझवानाचा कलाविष्कार…साडे पाच तासात चहा पावडरने माजी पंतप्रधानांची पोट्रेट!

Next Post

विद्यार्थ्याची क्रिएटिव्ह पॉवर, इलेक्ट्रिक सायकल सौर ऊर्जेवर धावणार!

Next Post
solar

विद्यार्थ्याची क्रिएटिव्ह पॉवर, इलेक्ट्रिक सायकल सौर ऊर्जेवर धावणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!