Thursday, June 12, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

वाढती महागाई, कंपन्यांची चलाखी! किंमत तीच पण पॅकमधील वस्तूंचं वजन कमी!

May 16, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
product

मुक्तपीठ टीम

वाढत्या महागाईमुळे प्रत्येक वस्तूंचे भाव वाढत आहेत. त्यामुळे ग्राहकोपयोगी वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या एफएमसीजी कंपन्यांनाही त्या महागाईचा सामना करावा लागत आहे. पण वस्तूंचे भाव वाढवले तर ग्राहक दुरावण्याची भीती आहे. त्यामुळे या कंपन्यांनी एक वेगळीच चलाखी केली आहे. उत्पादने महाग करण्याऐवजी ते वजन कमी करत आहेत. त्यामुळे ग्राहकांना वस्तू जुन्या किंमतीतच मिळत असल्या तरी त्यांचे वजन झालं आहे. म्हणजे पॅकची किंमत तीच पण आतील वस्तूंचे प्रमाण मात्र कमी!

दररोज वापरल्या जाणार्‍या उत्पादनांवर परिणाम

  • महागाईचा सर्वाधिक फटका बिस्किटे, चिप्स, छोटे साबण, चॉकलेट्स आणि नूडल्स या उत्पादनांना बसत आहे.
  • ही उत्पादने दररोज घरांमध्ये वापरली जातात.
  • पार्ले प्रोडक्ट्सचेही बिस्किट आणइ अन्य कमी वजनाचे पॅक जास्त विकले जात आहेत.
  • इमामीच्या एकूण व्यवसायात लहान पॅकचा वाटा २४% आहे.
  • ब्रिटानियाने सांगितले की, ५ आणि १० रुपयांची उत्पादने त्यांच्या व्यवसायात ५० ते ५५ टक्के योगदान देतात.

किंमत तीच, वजन मात्र कमी!

  • हल्दीरामने आलू भुजियाच्या पॅकचे वजन ५५ ग्रॅमवरून ४२ ग्रॅम केले आहे.
  • पार्ले जीने ५ रुपयांच्या बिस्किटांचे वजन ६४ ग्रॅमवरून ५५ ग्रॅम
  • तर विम बारचे वजन २० ग्रॅमने कमी केले आहे. ते आता १५५ ऐवजी १३५ ग्रॅम झाले आहे.
  • बिकाजीने नमकीनचे १० रुपये किंमतीचे पाकीट अर्ध्यावर ठेवले आहे.
  • पूर्वी ते ८० ग्रॅमचे होते ते आता ४० ग्रॅम झाले आहे. बहुतेक कंपन्यांनी हँडवॉशचे वजन २०० मिली वरून १७५ मिली पर्यंत कमी केले आहे.
  • १ ते १० रुपयांचे छोटे पॅक बहुतेक एफएमसीजी कंपन्यांच्या व्यवसायात २५ ते ३५ टक्के योगदान देतात. ते मोठ्या पॅकच्या किंमती वाढवतात, परंतु लहान पॅकच्या किंमती वाढवणे हा तोटा असेल.

शहरांमध्ये भाववाढ, खेड्यांमध्ये वजन कमी!

  • डाबर इंडियाने म्हटले आहे की, शहरी भागात ग्राहक जास्त पैसे देऊ शकतात, जिथे उत्पादने महाग झाली आहेत.
  • १ रुपये, ५ रुपये आणि १० रुपयांचे पॅक येथे अधिक विकले जात असल्याने गावांमध्ये पॅकेटचे वजन कमी झाले आहे.
  • सध्याच्या काळात महागाई वाढल्यामुळे, कंपन्या आता ब्रिज पॅक देखील सादर करत आहेत, ज्याचा अर्थ दोन किंमतीची उत्पादने एकत्र करणे.

Tags: Consumer goods productionFMCG companiesmuktpeethएफएमसीजी कंपन्याग्राहकोपयोगी वस्तू उत्पादनमुक्तपीठ
Previous Post

नव्या रणनीतीनं अंबानी ग्लोबल युनिलिव्हरला लोकल टक्कर देणार, छोटे भारतीय ब्रँड्स ताब्यात घेणार!

Next Post

ऐंशी वर्षांच्या चित्रकाराला अटक झाली तो डिजिटल बलात्काराचा गुन्हा असतो तरी काय?

Next Post
Rape Case

ऐंशी वर्षांच्या चित्रकाराला अटक झाली तो डिजिटल बलात्काराचा गुन्हा असतो तरी काय?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!