मुक्तपीठ टीम
कोरोना संकट केवळ आरोग्याचं संकट नव्हतं तर रोजगारावरीलही मोठं संकट ठरलं. लॉकडाऊन संसर्ग रोखून जीवित हानी टाळणारं होतं, पण अर्थकारणासाठी स्पीड ब्रेकरच ठरलं. त्यामुळे अनेक बेरोजगार झाले. आता मात्र आशेची किरणं फाकत आहेत. कोरोनाची दुसर्या लाट ओसरत असताना भारतातील नोकऱ्यांच्या संधींमध्ये वाढ होत आहे. मुंबई, दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद यासारख्या महानगरांमध्ये नोकरीच्या जास्तीत जास्त संधी वाढत आहेत.
रोजगाराच्या संधी कुठे कुठे?
• कोरोनाच्या दुसर्या लाटेपासून देशाची अर्थव्यवस्था सावरण्यास प्रारंभ झाला आहे.
• ज्यामुळे रोजगाराच्या संधींमध्ये वाढ झाली आहे.
• बँकिंग, फायनान्स आणि विमा, टेलिकॉम, मॅन्युफॅक्चरिंग आणि इंजिनीअरिंगमधील नोकरीच्या संधींमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे.
• उच्च पगाराच्या नोकऱ्यांच्या संख्येत वेगवान सुधारणा होत आहे.
• याशिवाय तंत्रज्ञानामध्ये नवीन व सखोल ज्ञान असलेल्या कर्मचार्यांची मागणी सर्वाधिक आहे.
तज्ज्ञांच्या मागणीमध्ये वाढ
- अहवालानुसार, कोरोना संकट काळात विक्री आणि तंत्रज्ञान व्यावसायिकांना सर्वाधिक मागणी आहे.
- यासह इतरांच्या तुलनेत पगारवाढही वाढली आहे.
- विक्री आणि तंत्रज्ञानातील वेतनात वाढ ११ टक्के आहे.
- तर इतर भागात ते १.७३ टक्क्यांच्या जवळपास राहिले आहे.
- विक्री आणि तंत्रज्ञानाव्यतिरिक्त, बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा आणि आरोग्य सेवा ही अशी क्षेत्रे आहेत जेथे वेतनात वाढ चांगली आहे.
लसीकरणामुळेही रोजगार संधीत वाढ
• मुंबई, दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद, कोलकाता, चेन्नई आणि चंदीगढमध्ये नोकरीच्या संधींसह पगाराची सर्वाधिक वाढ आहे.
• महानगरांमध्ये कोरोनाची लस अधिक लोकांना मिळत आहे.
• यामुळे लोकांना कोरोना संसर्गाची कमी भीती आहे.
• यामुळेच महानगरांमध्ये नोकर्यांच्या संधीतही वेगाने वाढल्या आहेत.
कोणत्या क्षेत्रात जास्त संधी?
• बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा, आरोग्य सेवा
• उत्पादन संबंधित क्षेत्रांच्या व्यवसायातही वेगाने सुधारणा होत आहे.
• टेलिकॉम क्षेत्रात वाढ खूप वेगवान झाली आहे.
• आयटी, ई-कॉमर्स, शिक्षण तंत्रज्ञान आणि आरोग्य सेवा