Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

देशातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ महाराष्ट्रात

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
maharashtra

मुक्तपीठ पीठ 

देशात प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाची मुहूर्तमेढ महाराष्ट्रातून होत आहे. या विद्यापिठाच्या अभ्यासक्रमांसाठी येत्या ऑक्टोबरपासून प्रवेश प्रक्रिया राबविण्याबाबतचे नियोजन करण्यात आले असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांनी सांगितले. त्याचबरोबर विद्यापीठ सुरू करण्याच्या दृष्टीने आवश्यक पदांची भरती प्रक्रिया व पायाभूत सुविधांच्या निर्मितीबाबत आवश्यक बाबींची पुर्तता करावी, असे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार म्हणाले.

दोन अभ्यासक्रम होणार सुरू

• आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापिठांतर्गत पहिल्या टप्प्यात दोन अभ्यासक्रमांना सुरुवात करण्यात येणार आहे.
• बी.बी.ए (स्पोर्ट मॅनेजमेंट) व बी.एससी (स्पोर्ट सायन्स) या दोन अभ्यासक्रमांसाठी साधारणपणे येत्या ऑक्टोबरपासून प्रवेश प्रक्रिया राबवली जाईल.
• या अभ्यासक्रमांसाठी प्रत्येकी ६० एवढी विद्यार्थीसंख्या असेल.

maharashtra

राज्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ सुरू करण्याच्या अनुषंगाने आज सह्याद्री अतिथीगृह येथे ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली, यावेळी ते बोलत होते. यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, आमदार रोहीत पवार, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा, क्रीडा व युवक कल्याण आयुक्त ओम प्रकाश बकोरिया, वास्तू शास्त्रज्ञ शशी प्रभू, सिम्बायोसिसच्या प्रमुख संचालक डॉ. विद्या येरवडेकर उपस्थित होते.

 

शरद पवारांच्या सूचना

• आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ सुरू करण्याच्या दृष्टीने कुलगुरू, कुलसचिव, प्राध्यापक आदी महत्त्वपूर्ण जागा भरणे आवश्यक आहे.
• त्यासाठी प्रशासकीय प्रकिया तातडीने पूर्ण करावी, असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले.
• त्याचबरोबर पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आवश्यक बाबींची पुर्तता करावी, असेही श्री. पवार म्हणाले.

 

क्रीडा मंत्री सुनील केदार यांच्या सूचना

• आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य असून हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याणमंत्री केदार म्हणाले.
• तसेच या विद्यापीठाच्या माध्यमातून चांगले प्रशिक्षक तयार होतील,
• राज्यातून चांगले खेळाडू तयार होतील असा विश्वास व्यक्त करत कुलगुरू व प्राध्यापकांची निवड तातडीने करून प्रवेश प्रक्रियेला वेग द्यावा, अशा सूचना मंत्री श्री. केदार यांनी प्रशासनाला दिल्या.

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंच्या सूचना

• ‘क्रीडा विद्यापिठाने ‘ऑन फिल्ड’ व ‘ऑफ फिल्ड’वर काम करून प्रशिक्षणावर अधिक भर द्यावा.
• तसेच चांगले प्रशिक्षक तयार करून त्यांना रोजगाराच्या संधी प्राप्त होतील असे नियोजन करणे आवश्यक आहे.
• जागतिक दर्जाचे प्रशिक्षण या विद्यापिठाच्या माध्यमातून येथे उपलब्ध होईल.
• या विद्यापिठांतर्गत शालेय स्तरावरील क्रीडा शिक्षकांना प्रशिक्षण देता येईल.

खासदार संजय राऊत म्हणाले, या विद्यापिठाच्या माध्यमातून शाळा, महाविद्यालयांमध्ये खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
शिवाय विद्यापिठाची उपकेंद्रे राज्यातील विविध विभागांसह देशाची राजधानी दिल्लीतही असावे.

 

आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये राज्यातील खेळाडूंचा सहभाग अधिक असावा यादृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना राउत यांनी केल्या.

 

क्रीडा व युवक कल्याण सेवा आयुक्त बकोरिया यांनी प्रास्ताविक करून क्रीडा विद्यापिठाबाबत सादरीकरण केले.


Tags: Environment Minister Aditya Thackerayपर्यटनमंत्री आदित्य ठाकरेसंजय राऊतसुनिल केदार
Previous Post

विदर्भ कोरोनामुक्तीकडे, फक्त ४६ रुग्ण! अतिवृष्टीग्रस्त ५ जिल्ह्यांमध्ये आजही संसर्ग तसाच!

Next Post

कोरोनाची दुसरी लाट ओसरताना नोकऱ्यांच्या संधीत वाढ!

Next Post
job

कोरोनाची दुसरी लाट ओसरताना नोकऱ्यांच्या संधीत वाढ!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!